Israel Iran Conflict : इस्रायलचे हायफा बंदर सुरक्षित, अदाणी समूहाच्या कामकाजावर कोणताही परिणाम नाही

Iran Missile attack on Haifa Port : हायफा पोर्ट इस्रायलसाठी एक महत्त्वाचे सागरी व्यापारी केंद्र आहे, या बंदरातून इस्रायलची 30% पेक्षा जास्त आयात होते.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

इराणने इस्रायलमधील हायफा पोर्टवर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याचा कोणताही परिणाम अदाणी समूहाच्या या बंदरावर झालेला नाही. हे बंदर पूर्णपणे सुरक्षित असून, मालाची चढ-उतार (लोडिंग-अनलोडिंग) नेहमीप्रमाणे सुरू असल्याची माहिती अदाणी एंटरप्रायझेसचे समूह मुख्य वित्तीय अधिकारी (CFO) जुगेशिंदर (रॉबी) सिंह यांनी दिली आहे.

नक्की वाचा : नागपूरमध्ये होणार हेलिकॉप्टरची निर्मिती 

नुकनासीच्या बातम्या म्हणजे निव्वळ अफवा

काही प्रसारमाध्यमांनी इराणच्या हल्ल्यात या बंदराचे नुकसान झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या, मात्र या बातम्या निव्वळ अफवा असल्याचे जुगेशिंदर सिंह यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे सांगितले आहे.  इराण-इस्रायलमधील वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवरही अदाणी समूह संचालन करत असलेले हे बंदर सुरक्षित असल्याचे आणि येथे व्यापारी कामकाज कोणतीही अडचण नसल्याचे सिंह यांनी सांगितले. यामुळे अदाणी समूहाच्या व्यवसायावर कोणताही थेट परिणाम झालेला नाही असे ते म्हणाले.

Advertisement

नक्की वाचा : गुंतवणूक करण्याचे 4 बेस्ट पर्याय, तज्ज्ञ काय सांगतात एकदा पाहाच

हल्ल्याचा परिणाम नाही

शनिवारी रात्री उशिरा इराणने इस्रायलमधील हायफा पोर्ट आणि जवळील एका तेल रिफायनरीवर क्षेपणास्त्र हल्ला केला होता. इराणवर इस्रायलने हवाई हल्ला केला होता, ज्यात इराणचे मोठे नुकसान झाले आहे. इराणची अण्वस्त्र सज्जता मोडून काढण्यासाठी हे हल्ले करण्यात आले होते. याला उत्तर म्हणून इराणने इस्रायलवर हल्ले केले होते.  मात्र या हल्ल्यामुळे हायफा पोर्टला मात्र कोणतेही नुकसान झाले नाही अशी माहिती देण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, "सध्या पोर्टवर 8 जहाजे आहेत आणि मालाच्या चढ-उताराच्या कामावर कोणताही परिणाम झालेला नाही.  

हायफा पोर्ट इस्रायलसाठी एक महत्त्वाचे सागरी व्यापारी केंद्र आहे, या बंदरातून इस्रायलची 30% पेक्षा जास्त आयात होते. अदाणी पोर्ट्सची या पोर्टमध्ये 70% भागीदारी आहे. अदाणी पोर्ट्सच्या (APSEZ) एकूण उलाढालीत हायफा पोर्टची भागीदारी 2% पेक्षा कमी असली तरी, कंपनीच्या एकूण उत्पन्नात याचे योगदान सुमारे 5% आहे. APSEZ सध्या एकूण 10.57 दशलक्ष टन मालाचे संचालन करते.


 

Topics mentioned in this article