जाहिरात

Investment News: गुंतवणूक करण्याचे 4 बेस्ट पर्याय, तज्ज्ञ काय सांगतात एकदा पाहाच

आजच्या घडीला सर्वच धोक्याचा विचार करून, जे चांगले पर्याय स्थिर उत्पन्नसाठी आहेत ते संक्षिप्त स्वरूपात देत आहे.

Investment News: गुंतवणूक करण्याचे 4 बेस्ट पर्याय, तज्ज्ञ काय सांगतात एकदा पाहाच
मुंबई:

केदार ओक

मध्यवर्ती बँकेने पतधोरण कालच जाहीर केले. त्यानुसार व्याजदरात 0.50 पैश्याची कपात आणि CRR (cash Reserve Ratio ) मध्ये 1% कपात सुचवली. यामुळे स्वाभाविकच कर्जं स्वस्त होतील. पण त्याचा परिणाम बँकेतून मिळणाऱ्या मुदत ठेवीवर सुद्धा होईल. साहजिकच जे गुंतवणूकदार स्थिर परताव्यावर अवलंबून आहेत, त्यांना याचा फटका बसणार आहे. अश्यावेळी पारंपरिक गुंतवणुकीचा अट्टाहास न धरता जे चांगले इतर पर्याय आहेत, त्याचा विचार करायला काहीच हरकत नाही. सध्या SWP (सिस्टमॅटिक विथ ड्रॉवल प्लॅन ) याचा खूप बोलबोला आहे. शिवाय याबाबतच्या रील्स समाजमाध्यमांवर आहेत. पण हा पर्याय खरंच किती व्यवहार्य आहे, याची पडताळणी करणं सुद्धा गरजेचं आहे. आजच्या घडीला सर्वच धोक्याचा विचार करून, जे चांगले पर्याय स्थिर उत्पन्नसाठी आहेत ते संक्षिप्त स्वरूपात देत आहे . 20 वर्षाचा अनुभवातून ते जास्त योग्य वाटतात. सामान्य गुंतवणूकदारांनी त्याचा योग्य वापर केल्यास नक्कीच चांगला परतावा ते घेऊ शकतील यात शंका नाही .फक्त गरज आहे ते सजग राहण्याची आणि व्यावहारिक विचारांची.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

1. मासिक इनकम योजना : आज म्युच्युअल फंड हाऊसेस अश्या प्रकारच्या योजना राबवित आहेत. यातून  येणार उत्पन्न हे लाभांश स्वरूपात असते. साधारण 9% ते 10 % परतावा यातून येतो. या योजनेतील गुंतवणूक साधारण 3 ते 5 वर्ष ठेवल्यास मुद्दल ही वाढते आणि स्थिर उत्पन्न येत राहते. यातील वाढलेली मुद्दल आणि मिळणार लाभांश एकत्र केल्यास यातील परतावा  साधारण 15% ते 18% पर्यंत जातो.

2. नॉन नॉन कॉन्व्हर्टीबल डिबेंचर : काही मोठे उद्योग हाऊसेस अश्या स्वरूपाच्या गुंतवणूक माध्यमातून 3 ते 5 वर्षाच्या कालावधीत 9% ते 10% परतावा देतात. एक डिबेंचर हा साधारण रु.1000/- असून त्यापटीत यात गुंतवणूक करता येते. या गुंतवणुकीसाठी डिमॅट अकाउंट असणे गरजेचे आहे. ह्या गुंतवणूक पर्यायात  हे डिबेंचर बाजारात  व्यवहार करता येण्याजोगे असल्यामुळे त्याची किंमत वाढल्यास बाजारातही विकू शकतात.

3. मार्केट लिंक डिबेंचर : हा सुद्धा एक नवीन गुंतवणूक पर्याय असून यात काही पर्यायात मुद्दल सुरक्षेची हमी आणि 9.75% ते 10% परतावा मिळू शकतो. यांचा कालावधी साधारण 27/35/42 महिने असा आहे. यात गुंतवणूक करणे थोडे जखमीचे मानले जाते. या कालावधीत शेअर बाजारातील निर्देशांकात चांगली वाढ झाल्यास सांगितलेल्या परताव्याच्या अधिक परतावा मिळतो. अर्थात तो शाश्वत नसतो. तो शेअर बाजारावर अवलंबून असतो.

4. SWP: सध्या रील्सच्या माध्यमातून याचा प्रचार खूप केला जात असून गुंतवणूक करताना याची संपूर्ण कल्पना घेतल्याशिवाय  शक्यतो करू नये. यात गुंतवणूक करताना वेटिंग कालावधी निश्चित करून मगच परतावा घ्यावा. उदाहरणार्थ आपण 10 लाख रुपये यात ठेवलेत तर साधारण 18 महिने वेटिंग घेऊन जी रक्कम झाली असेल त्यावर साधारण 7% ते 7.5 % परतावा मिळवावा.म्हणजे मुद्दलाला हात शक्यतो लागणार नाही.

ट्रेंडिंग बातमी - Uddhav Raj News: 'हो आम्ही घाबरलोय'! ठाकरे एकत्र येणार यावर राणे थेट बोलले

या व्यतिरिक्त अजून काही गुंतवणूक  पर्याय बाजारात उपलब्ध आहेत. पण आपल्या सल्लागाराची मदत आपली जोखीम घ्यायची क्षमता आणि याबद्दलची पूर्ण माहिती हे लक्षात घेऊन  निर्णय घ्यावा.सदर लेख हा माहितीसाठी आहे याची नोंद घ्यावी. लेखक हे सेबी नोंदणीकृत सल्लागार आहेत. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com