जाहिरात

अदाणी समुहाने फेटाळला WSJ चा रिपोर्ट, वृत्त निराधार आणि चुकीचे असल्याचं स्पष्टीकरण

अदाणी समुहाने फेटाळला WSJ चा रिपोर्ट, वृत्त निराधार आणि चुकीचे असल्याचं स्पष्टीकरण
मुंबई:


अदाणी एंटरप्रायझेसने (Adani Enterprises) वॉल स्ट्रीट जर्नलच्या (WSJ) वृत्ताचे खंडन केले आहे. अदाणी समूहाने अमेरिकन निर्बंधांच्या उल्लंघनाच्या सर्व आरोपांना 'निराधार' ठरवले असून ते फेटाळून लावले आहेत. अदाणी समूहाच्या कंपन्या आणि इराणी एलपीजी (LPG) यांच्यातील संबंधांचा आरोप पूर्णपणे निराधार आणि चुकीचा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. इराणी एलपीजीशी संबंधित निर्बंधांचे उल्लंघन करण्यामध्ये जाणूनबुजून कोणताही सहभाग नसल्याचे समूहाने स्पष्ट केले आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

अदाणी समूहाची भूमिका

एक्स्चेंज फाइलिंगनुसार, अदाणी समूहाने सांगितले की, इराणी एलपीजीशी संबंधित अमेरिकन अधिकाऱ्यांकडून कोणत्याही चौकशीची त्यांना माहिती नाही. डब्ल्यूएसजेचे वृत्त पूर्णपणे चुकीचे आणि केवळ अटकळांवर आधारित असल्याचे दिसते. त्यांच्या कंपन्या जाणूनबुजून इराणवरील अमेरिकन निर्बंधांचे उल्लंघन करत असल्याचा दावा समूहाने फेटाळला आहे. अशा प्रकारचा दावा समूहाला बदनाम करण्यासाठी आणि त्यांची प्रतिष्ठा खराब करण्यासाठी हेतुपुरस्सर केला गेला आहे.

बंदरांवरील धोरण

अदाणी समूहाच्या कोणत्याही बंदरावर इराणी झेंड्याखाली आलेला कोणताही माल हाताळला जात नाही. हा समूह इराणमधील कोणतीही शिपमेंट किंवा इराणी जहाज व्यवस्थापित करत नाही. तसेच, इराणी मालकीच्या किंवा इराणी जहाजांना व्यवस्थापित किंवा सेवा देत नाही. इराणबाबतचे आपले धोरण सर्व बंदरांवर कठोरपणे पाळले जाते, असे समूहाने स्पष्ट केले आहे.

( नक्की वाचा : Adani Ports NCDs : अदाणी पोर्ट्सने 15 वर्षांच्या NCDs मधून 5000 कोटी उभारले, सर्वात मोठा देशांतर्गत बॉन्ड LIC कडून सबस्क्राईब )
 

डब्ल्यूएसजेचा आरोप काय होता?

डब्ल्यूएसजेने (WSJ) दिलेल्या वृत्तानुसार, अदाणी समूहाच्या (Adani Group) कंपन्या इराणी पेट्रोकेमिकल उत्पादनांच्या आयातीमध्ये सहभागी होत्या की नाही, याबाबत अमेरिकन अधिकारी तपास करत आहेत.

वॉल स्ट्रीट जर्नलच्या (WSJ) अहवालानुसार, मुंद्रा बंदरामार्गे इराणमधून लिक्विफाइड पेट्रोलियम गॅसचा (LPG) आयात भारतात झाला आहे का, याचा शोध घेण्याचा अमेरिकन अधिकारी प्रयत्न करत होते. अहवालात म्हटले होते की, काही टँकर जे नियमितपणे मुंद्रा आणि पर्शियन गल्फ दरम्यान ये-जा करत होते, त्यांनी अशा हालचाली दर्शविल्या आहेत ज्या सामान्यतः निर्बंध टाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या जहाजांद्वारे केल्या जातात.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com