Adani Group : अदाणी समूहाकडून 58,104 कोटी रुपयांचं टॅक्स योगदान, ट्रान्सपरन्सी रिपोर्ट आला समोर

अदाणी समूहाच्या लिस्टिंग कंपन्यांनी 2023-24 या वर्षात सरकारला टॅक्सच्या स्वरुपात 58,104 कोटी रुपये भरले आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

Tax Transparency Report :अदाणी समूहाच्या लिस्टिंग कंपन्यांनी 2023-24 या वर्षात सरकारला टॅक्सच्या स्वरुपात 58,104 कोटी रुपये भरले आहेत. यापूर्वीच्या वर्षात हा आकडा 46,610.2 कोटी इतका होता.  कंपनीकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे. अदाणी समूहाने सरकारच्या सर्वोच्च मानकांचे पालन करीत आणि आपल्या सर्व भागधारकांच्या विश्वासाची जबाबदारी घेत 2023-24 वर्षासाठी आपला कर पारदर्शकता अहवाल म्हणजे टॅक्स ट्रान्सपरन्सी रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

अदाणी समूहाच्या लिस्टिंग कंपन्यांमध्ये अदाणी एंटरप्रायजेस लिमिटेड, अदाणी पोर्ट्स अँड स्पेशल इकोनॉमिक झोन लिमिटेड, अदाणी ग्रीन एनर्जी लिमिटेड, अदाणी एनर्जी सॉल्यूशन लिमिटेड, अदाणी पॉवर लिमिटेड, अदाणी टोटल गॅस लिमिटेड आणि अंबुजा सिमेंट लिमिटेड यांचा समावेश आहे. यांचे वेगवेगळे अहवाल प्रसिद्ध करण्यात आले आहेत. यामध्ये अदाणी समूहाच्या तीन अन्य लिस्टेड कंपन्या एनडीटीव्ही, एसीसी आणि सांघी इंडस्ट्रीजकडून दिलेल्या टॅक्सचाही समावेश आहे, ज्यावर या सात कंपन्यांचं नियंत्रण असतं. अदाणी ग्रूपचे चेअरमन गौतम अदाणी म्हणाले, पारदर्शकता विश्वासाचा पहिला स्तंभ असतो आणि मजबूत वाढ होण्यासाठी विश्वास आवश्यक आहे. 

नक्की वाचा - अदाणी इलेक्ट्रिसिटी मुंबई बनली देशातील पहिल्या क्रमांची वीज कंपनी! ऊर्जा मंत्रालयाकडून शिक्कामोर्तब

भारताच्या तिजोरीतील सर्वात मोठं योगदान देणाऱ्यांपैकी आम्ही एक आहोत. त्यामुळे आमची जबाबदारी ही केवळ सरकारी नियमांचे आणि कायद्यांचे पालन करण्यापर्यंत सीमित नाही, तर करण्यापलीकडची आहे. ज्यामध्ये प्रामाणिकपणा आणि उत्तरादायित्व महत्त्वाचं आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत आम्ही योगदान देत असलेला प्रत्येक रुपया हा पारदर्शकता आणि सुशासनासाठी वचनबद्ध आहे.  - गौतम अदाणी, चेअरमन