Adani-Hindenburg case: हिंडनबर्ग आणि नॅथन अँडरसनला SEBI ची कारणे दाखवा नोटीस

Adani-Hindenburg case: शेअर बाजार नियामकने आरोप केला की, हिंडनबर्ग आणि अँडरसनने सेबी अॅक्ट अंतर्गत प्रिवेन्शन ऑफ फ्रॉडलेंट अँड अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसेस रेग्युलेशन, सेबी कोड ऑफ कंडक्ट फॉर रिसर्च अॅनालिस्ट रेग्युलेशनचं उल्लंघन केलं आहे.

Advertisement
Read Time: 1 min

अदाणी समूहाबाबत दिशाभूल करणारा रिपोर्ट जारी केल्याबद्दल सेबीने अमेरिकन शॉर्टसेलर हिंडनबर्ग रिसर्च, नॅथन अँडरसन आणि मॉरिशस बेस्ड FPI मार्क किंगडनला कारणे दाखला नोटीस बजावली आहे. सेबीने अदाणी एन्टरप्रायझेसच्या शेअर्समध्ये ट्रेडिंग नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी ही नोटीस जारी केली आहे. 

शेअर बाजार नियामकाने आरोप केले की, हिंडनबर्ग आणि अँडरसनने सेबी अॅक्ट अंतर्गत प्रिवेन्शन ऑफ फ्रॉडलेंट अँड अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसेस रेग्युलेशन, सेबी कोड ऑफ कंडक्ट फॉर रिसर्च अॅनालिस्ट रेग्युलेशनचं उल्लंघन केलं आहे.

सेबीच्या चौकशीत काय आढळलं?

सेबीने याबाबत सांगितलं की, हिंडनबर्ग आणि FPI ने दिशाभूल करणारी माहिती दिली की रिपोर्ट केवळ भारताबाहेर ट्रेडिंग करणाऱ्या सिक्युरिटीजच्या वॅल्युएशनसाठी होती. मात्र ती माहिती भारतातील लिस्टेड कंपन्यांसंबधी होती. 

सेबीने पुढे म्हटलं की, किंगडनने हिंडनबर्गला अप्रत्यक्षपणे अदानी एंटरप्रायझेसमध्ये सहभागी होण्यासाठी शॉर्ट सेलर्सना मदत करून भारतीय डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये कंपनीच्या फ्युचर्समध्ये ट्रेड करण्यासाठी आणि रिसर्च फर्मसोबत नफा शेअर करण्यासाठी मदत केली.

Advertisement

दुसरीकडे,  हिंडेनबर्गने जानेवारी 2023 मध्ये जारी केलेल्या अहवालाच्या बचावासाठी युक्तिवाद चालू ठेवले आहेत.

Topics mentioned in this article