अदाणी मुंद्रा क्लस्टरचा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या ट्रान्झिशनल इंडस्ट्रियल क्लस्टर्समध्ये समावेश

या उपक्रमाचा उद्देश जागतिक क्लस्टर्समध्ये सहयोग वाढवणे आणि त्यांना एकत्रितपणे पुढे नेणे हे आहे जेणेकरुन ते 2050 पर्यंत डीकार्बोनायझेशनच्या लक्ष्याकडे वाटचाल करू शकतील.

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

अदाणी समूहातील तीन कंपन्यांचे 'अदाणी मुंद्रा क्लस्टर' तयार करण्यात आले असून त्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या 'ट्रान्झिशनिंग इंडस्ट्रियल क्लस्टर्स' उपक्रमात सामील झाल्या आहेत. या कंपन्यांमध्ये अदाणी एंटरप्रायझेस (उपकंपनी अदाणी न्यू इंडस्ट्रीज (ANIL) द्वारे), अदाणी पोर्ट्स आणि अंबुजा सिमेंट्स यांचा समावेश आहे. कार्बन मुक्तीच्या लढ्याला अधिक बळकटी मिळण्यास यामुळे मदत होईल असा विश्वास जागतिक आर्थिक परिषदेने व्यक्त केला आहे. 2050 सालापर्यंत डिकार्बनायझेशनचे म्हणजेच कार्बन मुक्तीचे उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवण्यात आले आहे.  या उपक्रमाचा उद्देश जागतिक क्लस्टर्समध्ये सहयोग वाढवणे आणि त्यांना एकत्रितपणे पुढे नेणे हे आहे जेणेकरुन ते 2050 पर्यंत डीकार्बोनायझेशनच्या लक्ष्याकडे वाटचाल करू शकतील.  मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करणे  आर्थिक विकासाला अधिक गती देणे हा देखील यामागचा उद्देश आहे.  

नक्की वाचा : नवरात्रौत्सवात मंडळांना सवलतीच्या दरात वीजपुरवठा, अदाणी इलेक्ट्रिसिटीचा निर्णय 

जागतिक आर्थिक परिषदेचे कार्यकारी समिती सदस्य  रॉबर्टो बोका यांनी या घडामोडींबाबत बोलताना म्हटले की,आम्ही भारतातील पहिल्या दोनपैकी एक असलेल्या अदानी मुंद्रा क्लस्टरचे आमच्या 23 औद्योगिक क्लस्टर्सच्या आंतरराष्ट्रीय समुदायामध्ये स्वागत करत आहोत. गुजरातच्या महत्त्वपूर्ण अक्षय्य ऊर्जा क्षमतेचा वापर करून, हे क्लस्टर दक्षिण आशियातील सर्वात मोठे ग्रीन हायड्रोजन हब बनण्यासाठी सज्ज झाले आहे.  अदाणी पोर्ट्सने 2025 पर्यंत बंदरातील सर्व संचालनासाठी लागणाऱ्या वीजेची गरज   अपारंपरीक उर्जेच्या माध्यमातून पूर्ण करण्याचे उद्दीष्ट्य डोळ्यासमोर ठेवले आहे.  2040 पर्यंत  शून्य कार्बन उत्सर्जनचे उद्दीष्ट्य गाठण्याचेही उद्दीष्ट्य  अदाणी पोर्ट्सने डोळ्यासमोर ठेवले आहे. 

नक्की वाचा: मज्जाच मज्जा! नव्या प्रीपेड प्लॅनमध्ये अल्पदरात दररोज मिळेल 1 जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग

अदानी पोर्ट्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि अंबुजा सिमेंट्सचे संचालक करण अदाणी यांनी म्हटले  की, 'वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या ट्रान्सिशनल इंडस्ट्रियल क्लस्टर उपक्रमामध्ये सहभागी होणे हे फायदेशीर ठरणार आहे.  या निर्णयामुळे जागतिक उद्योगातील समकक्ष कंपन्या, थिंक टँक, धोरणे ठरवणाऱ्या व्यक्ती आणि संस्था तसेच तज्ज्ञांचे सहकार्य लाभेल आणि डिकार्बनायझेशनसाठीचे उद्दीष्ट्य पूर्ण करण्यासाठी वेगळा विचार करून तो अंमलात आणण्याची संधी मिळेल.   ते पुढे म्हणाले की, 'अदाणी मुंद्रा क्लस्टरचा मानस एकात्मिक हरित हायड्रोजन उत्पादन केंद्र बनण्याचा आहे.  यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाच्या क्षेत्रांनाही डिकार्बनाइज करण्यासाठी मदत करणे शक्य होईल. यामुळे भारताचा उर्जेसाठी इतरांवर अवलंबून राहण्याचे प्रमाण कमी होईल.  

Topics mentioned in this article