Advantage Assam 2.0 Summit : अदाणी समूह आसाममध्ये 50,000 कोटींची गुंतवणूक करणार, गौतम अदाणींची मोठी घोषणा

आज Advantage Assam 2.0 Summit 2025 मध्ये गौतम अदाणींनी मोठी घोषणा केली आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins
Advantage Assam 2.0 Summit : अदाणी समूह आसाममध्ये 50,000 कोटींची गुंतवणूक करणार, गौतम अदाणींची मोठी घोषणा

Advantage Assam 2.0 Summit 2025 : काल 24 फेब्रुवारीला MP Global Investors Summit 2025 मध्ये अदाणी समूहाचे चेअरमन गौतम अदाणी यांनी मध्य प्रदेशात 1.10 लाख कोटींची गुंतवणूक करणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर आज Advantage Assam 2.0 Summit 2025 मध्ये गौतम अदाणींनी मोठी घोषणा केली आहे. अदाणी समूह आसाममध्ये 50,000 कोटींची गुंतवणूक करणार आहे. ही गुंतवणूक विमानतळ, सिटी गॅस, रस्ते, हवाई या क्षेत्रात ही गुंतवणूक केली जाणार आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

अदाणी समूह आसाममध्ये 50,000 कोटींची गुंतवणूक करणार आहे. ही गुंतवणूक विमानतळ, सिटी गॅस, रस्ते, हवाई या क्षेत्रात ही गुंतवणूक केली जाणार आहे. आसाममध्ये मंगळवारपासून दोन दिवसीय बिजनेस समिटला सुरुवात झाली आहे. यावेळी अदाणी समूहाचे चेअरमन गौतम अदाणींनी परिषदेला संबोधित केलं. यावेळी ते म्हणाले, जेव्हा कधी पंतप्रधान मोदींची भेट घेतो, तेव्हा प्रेरणा मिळते.

नक्की वाचा - MP Global Investors Summit 2025 मध्ये गौतम अदाणींची मोठी घोषणा, मध्यप्रदेशात 1.10 लाख कोटींची गुंतवणूक करणार

गौतम अदाणीं गुंतवणूक शिखर संमेलनाबद्दल म्हणाले, पंतप्रधान मोदींच्या या स्वप्नाची सुरुवात 2003 मध्ये गुजरातमधून झाली होती. वायब्रंट गुजराज ग्लोबल समिटमध्ये पीएम मोदींची दूरदृष्टी स्पष्टपणे पाहता आली. त्यांनी अत्यंत उत्साहाने याची सुरुवात केली. त्यांचा उत्साह पाहून देशातील सर्व राज्यांना प्रेरणा मिळू लागली. सर्व राज्यांनी गुंतवणुकीचं महत्त्व आणि आर्थिक परिवर्तनाचा स्वीकार केला. गेल्या दोन दशकात गुंतवणूकदारांच्या शिखर परिषदेने याच्या खऱ्या महत्त्वाकांक्षा उघड केल्या आहे.   

Advertisement