जाहिरात

Ajit Jaokar: AIचा प्रभाव, IT क्षेत्रातील नोकऱ्यांवर येणार गदा; ऑक्सफोर्डमधील प्राध्यापकांची EXCLUSIVE मुलाखत

एनडीव्ही मराठीचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी घेतलेल्या एक्सक्लुझिव मुलाखतीत ते बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी एआय तंत्रज्ञानाची भविष्याची वाटचाल कशी असेल. याबाबत महत्त्वाचे विधान केले. 

Ajit Jaokar: AIचा प्रभाव, IT क्षेत्रातील नोकऱ्यांवर येणार गदा; ऑक्सफोर्डमधील  प्राध्यापकांची EXCLUSIVE मुलाखत

राहुल कुलकर्णी, बारामती:  एआय (AI) म्हणजेच आर्टिफिशल इंटिलिजेंसचा वापर दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. बारामतीमध्ये एआय तंत्रज्ञानाचा ऊसाच्या शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. दुसरीकडे वैद्यकीय क्षेत्रामध्ये, शिक्षण क्षेत्रामध्येही एआय तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. एयआयच्या या सर्व क्षेत्रांमध्ये वाढत्या प्रभावामुळे भविष्यात अनेकांच्या नोकऱ्यांवर गदा येईल, असा दावा ऑक्सफोर्ड विद्यापीठाचे AI कोर्सचे सल्लागार डॉ. अजित जावकर यांनी व्यक्त केली. एनडीव्ही मराठीचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी घेतलेल्या एक्सक्लुझिव मुलाखतीत ते बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी एआय तंत्रज्ञानाची भविष्याची वाटचाल कशी असेल. याबाबत महत्त्वाचे विधान केले. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

एआयचा वापर शैक्षणिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात होत आहे. आमचा उद्देश विद्यार्थ्यांना एयआय इंजिनिअरिंगकडे वळवणे हा आमचा महत्त्वाचा उद्देश आहे. क्रिएटीव्हमध्येही एआयचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असून विविध क्षेत्रांमध्ये त्यांना एयआय वापरण्याचा सल्ला देत आहोत, असं डॉ. अजित जावकर म्हणाले.

भविष्यामध्ये एआय अधिक शक्तिशाली होईल, ज्यामुळे अनेक समस्या तंत्रज्ञानाच्या मदतीने दूर होतील. अगदी युद्धातही एआयचा वापर होताना दिसत आहे. ड्रोनसारख्या उपकरणांमध्ये एआयचा वापर होत आहे. मात्र शेवटी त्याच्यावर कंट्रोल हा मानवी असेल, असे म्हणत भविष्यामध्ये एआयचा सर्व क्षेत्रांमध्ये प्रभाव वाढेल, ज्यामुळे मानवी हस्तक्षेप बंद होऊन तंत्रज्ञान जागा घेईल, असा दावाही अजित जावकर यांनी केला. 

यावेळी बोलताना डॉ. अजित जावकर यांनी आगामी काळात अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागतील, असा धोक्याचा इशाराही दिला. युकेमध्ये एआय तंत्रज्ञानात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत आहे, स्टार्टअप्स होत आहेत. त्यासोबतच दुसरे देशही एआयचा वापर करण्याच इच्छुक आहेत. ज्याप्रमाणे बारामतीमध्ये एआयचा वापर ऊसशेतीसाठी होत आहे. ज्याचा उपयोग भारतासह दक्षिण आफ्रिकेतही होईल, असं अजित जावकर म्हणाले.

(नक्की वाचा-  Baramati Crime : अंत्यविधीची तयारी थांबली, 9 वर्षांच्या पीयुषच्या शवविच्छेदनानंतर बापाचं घृणास्पद कृत्य समोर )

तसेच एआय तंत्रज्ञानाचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होईल. जे नवीन डेव्हलपर्स म्हणजेच इंजिनिअर्स आहेत, त्यांची जागा एआय घेईल. नवे डेव्हलपर्स व्हिज्युलायजेशन, एनॅलिसीस करतात. ते व्हिज्युलायजेशन, एनॅलिसीस एआयकडूनही होईल. त्यामुळे अशा नव्या डेव्हलपर्सच्या नोकऱ्या जातील. मात्र त्याचा परिणाम भारतात किती प्रमाणात होईल, याची निश्चित आकडेवारी देता येणार नाही, असंही अजित जावकर म्हणाले. 

सोशल मीडिया ते  ते उत्पादननिर्मिती अशा सर्वच क्षेत्रापर्यंत सर्वच क्षेत्रात एआयचा वापर वाढू लागला आहे. एआयमुळे नोकरीच्या क्षेत्रात प्रचंड बदल होत आहेत मात्र जर नोकरी करताना आपण तंत्रज्ञानासंबंधी योग्य अपडेट राहिलात तर नोकरी राखूच त्यासोबत नवनवीन संधीही मिळू शकते. चाट जीपीटी, डोमेनचे शिक्षण घेणे आवश्यक आहे, असं सांगत एआयमुळे मानवी आयुष्यात आमुलाग्र बदल होतील. मानवी आयुष्य अधिक सुखदायी, प्रभावी आणि सोप्प होईल, असं अजित जावकर म्हणाले. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: