City Bank : कर्मचाऱ्यांचा प्रताप, ग्राहकाच्या खात्यात चुकून 7 हजार लाख कोटी पाठवले; बँकेत उडाला गोंधळ!

जर तुमच्या बँक अकाऊंटमध्ये अचानक 7 हजार लाख कोटी रुपये आले तर???

जाहिरात
Read Time: 2 mins

America Citibank : जर तुमच्या बँक अकाऊंटमध्ये अचानक 7 हजार लाख कोटी रुपये आले तर??? अर्थात यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही. मात्र ही घटना घडलीये. तेदेखील अमेरिकेत. जगातील सर्वात मोठ्या बँकेपैकी एक सिटीग्रुपकडून एक मोठी चूक झाली. वेळीच हा गोंधळ लक्षात आला अन्यथा ही इतिहासातील सर्वात मोठी चूक ठरली असती.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

सिटी बँकेने एका ग्राहकाच्या खात्यात  $280 ऐवजी चुकून तब्बल $81 ट्रिलियन (67.31 लाख अरब रुपये) जमा केले आहेत. ही रक्कम भारताच्या 2024 च्या जीडीपीपेक्षा ($3.7 ट्रिलियन) 22 पटीने जास्त आहे. पहिल्या दोन कर्मचाऱ्यांकडून हा प्रकार दुर्लक्षित राहिला. तिसऱ्या कर्मचाऱ्याला हा गोंधळ दिसताच त्याने ही चूक लक्षात आणून दिली. ज्या ग्राहकाच्या खात्यात हे पैसे टाकण्यात आले होते, त्याने आपल्या अकाऊंटमधून एक रुपयाही खर्च केला नाही. ही घटना गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात घडली. धक्कादायक बाब म्हणजे हा प्रकार घडल्याच्या दीड तासांनी ही मोठी चूक लक्षात आली. यानंतर खळबळ उडावी. 

नक्की वाचा - Share Market : 31 वर्षांनंतर बाजारात भयंकर परिस्थिती! काय आहेत कारणं आणि उपाय? वाचा तज्ज्ञांचा सल्ला

बँकेचं म्हणणं काय आहे?
फायनॅन्शियल टाइम्सच्या एका अहवालानुसार, सिटीग्रुपचे प्रवक्ता म्हणाले, एवढी मोठी रक्कम भरणे खरोखरच शक्य नव्हते. परंतु आमच्या सुरक्षा यंत्रणेने ही चूक त्वरित पकडली आणि ती सुधारली. त्या अकाऊंटमधील एकही पैसे काढता येऊ नये याची काळजी कर्मचाऱ्यांकडून आधीच घेण्यात आली होती.  यापूर्वीही सिटीबँकेच्या अनेक चूका समोर आल्या होत्या. गेल्या वर्षी जुलै महिन्यात सिटीग्रुपला $136 मिलियनचा दंड ठोठावण्यात आला होता. यापूर्वी 2020 मध्येही बँकेवर $400 मिलियनचा दंड लावण्यात आला होता.