जाहिरात

Share Market : 31 वर्षांनंतर बाजारात भयंकर परिस्थिती! काय आहेत कारणं आणि उपाय? वाचा तज्ज्ञांचा सल्ला

Share Market Crash : फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशी  महिन्याभराचा विचार केला, तर मुंबई शेअर बाजाराचं एकूण बाजार मूल्य जवळपास 40 लाख कोटींची कमी झालंय.  

Share Market : 31 वर्षांनंतर बाजारात भयंकर परिस्थिती! काय आहेत कारणं आणि उपाय? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
मुंबई:

शेअर बाजारात थेट किंवा म्युच्युअल फंडांच्या माध्यममातून गुंतवणूक करणाऱ्यांमध्ये महाराष्ट्रातली जनता सर्वाधिक आहे. या सर्वांसाठी फेब्रुवारी महिना गेल्या पाच एक वर्षातला सर्वात वाईट महिना ठरलाय. फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशी  महिन्याभराचा विचार केला, तर मुंबई शेअर बाजाराचं एकूण बाजार मूल्य जवळपास 40 लाख कोटींची कमी झालंय.  

गेल्या पाच महिन्यात बाजाराने सातत्यानं निगेटिव्ह रिटर्न दिले आहे आणि हे गेल्या 31 वर्षात पहिल्यांदाच घडलंय.. तुम्ही म्हणाल की म्हणजे आता बाजारात गुंतवणूक करायची की नाही ? या सर्व प्रश्नांची उत्तरं आम्ही तुम्हाला देणार आहोत. 

 ('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

किती कोसळला बाजार?

  • आज एका दिवसात (28 फेब्रुवारी) 9 दिग्गज कंपन्यांचे शेअर्स 52 आठवड्याच्या नीचांकी  पातळीवर पोहचले आहेत.
  • गेले पाच महिने शेअर बाजार सतत घसरतोय. 
  • सप्टेंबर 2024मध्ये निफ्टीनं 26277ची सर्वोच्च  पातळी गाठली होती. तेव्हापासून बाजाराचा उतरणीचा काळ सुरु झाला.
  • ऑक्टोबर 2024मध्ये निफ्टी  6.2 % घसरला
  • नोव्हेंबर  2024 मध्ये निफ्टी  1.49 % घसरला
  • डिसेंबर  2024 मध्ये निफ्टी  1.99 % आपटला    
  • जानेवारी 2025 मध्ये निफ्टी  2.76%  गडगडला
  • फेब्रुवारी 2025 मध्ये निफ्टी  3.56 % घसरला
  • गेल्या पाच महिन्यात निफ्टी 16 टक्के म्हणजे 4 हजार 116 अंकांनी घसरलाय.

मार्केटच्या पडझडीची कारणं काय?

गेल्या 31 वर्षात बाजारात इतकी मोठी आणि इतक्या सातत्यानं पडझड बघयाला मिळालेली नाही.  यामागे पाच प्रमुख कारणं आहे. 

  1. कंपन्यांना अपेक्षित नफा न होणे
  2. कंपन्यांच्या भविष्यातील नफ्याविषयी अनिश्चितता
  3. ट्रम्प यांनी जगभरात छेडलेलं टेरिफ वॉर 
  4. डॉलरच्या तुलनेत जगभरातल्या चलानांची पिछेहाट
  5. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी भरभरून केलेली विक्री

तज्ज्ञांचा सल्ला काय?

कोरानाच्या काळात किंवा त्यानंतर बाजारात आलेल्यांसाठी गेले पाच महिने म्हणजे एखाद्या काळ रात्रीसारखे आहेत. जिथे पैसे टाकाल तो असेट क्लास खाली जातोय. अशावेळी  गुंतवणूकदारांचा विश्वास डळमळीत होणे स्वाभाविक आहे. पण बाजार हा चढ उतारांचाच खेळ आहे. जो बाजारात पडताना उभा राहिला तोच मोठा फायदा कमावतो हेही तितकंच खरं आहे, असं मत सेबी नोंदणीकृत कन्सिलिएटर उदय तारदाळकर यांनी 'NDTV मराठी' शी बोलताना व्यक्त केलं. 

( नक्की वाचा : LPG ते FD! 1 मार्चपासून होणार 6 महत्त्वाचे बदल, वाचा तुमच्या खिशावर काय होणार परिणाम? )
 

बाजारातील किंवा म्युच्युअल फंडातली गुंतवणूक ही किमान तीन ते पाच वर्षासाठी करावी असे सगळेच सल्लागार सांगतात. प्रत्यक्षात छोटे गुंतवणूकदार किरकोळ पडझड झाली,की बाजारात जो मिळतोय तो नफा घेऊन बाजूला होतात. आणि मग मोठ्या नफ्याला मुकतात असा सगळ्यांचा  अनुभव आहे. त्यामुळे सध्या बाजारातली पडझड मोठी असली, तरी SIPतील गुंतवणूक थांबवण्याची  वेळ नक्कीच नाही, असा सल्ला गुंतवणूक सल्लागार प्रीती झेंडे यांनी दिलाय. 

बाजारात गुंतवणुक ही जोखमीची असते. त्यात कधीतरी नफा कधीतरी तोटा होणारच. पण म्हणूनच बाजारात गुंतवणूक करताना जे पैसे तुम्हाला पुढची काही वर्ष अजिबात लागणार नाहीत असेच पैसे गुंतवा. नजीकच्या भविष्यात खर्चासाठी लागणारे पैसे बाजारात ओतू नका आणि एकदा बाजारात उतरण्याचा निर्णय घेतल्यावर एक वाक्य नक्की लक्षात ठेवा.. माणूस असो की बाजार शेवटी सगळ्यांना वरच जायचं आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: