ऑफिसमध्ये कामाचे तास किती असावेत यावर सोशल मीडियावर बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी नारायण मूर्तींनी कर्मचाऱ्यांना 70 तास काम करण्याचा सल्ला दिल्यानंतर अनेक उद्योगपती याबाबत आपलं म्हणणं मांडत आहेत. यामध्ये ज्येष्ठ उद्योगपतींपासून अगदी स्टार्टअप फाऊंडरचा समावेश आहे. काहींनी तर कर्मचाऱ्यांना सात दिवस काम करण्याचाही सल्ला दिला आहे. नेहमीप्रमाणे उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी लोकांची मनं जिंकलं आहे. कामाच्या तासांबाबत चर्चा सुरू असताना आनंद महिंद्रा यांनी कामाच्या गुणवत्तावर लक्ष वेधलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
वर्क लाइफ बॅलेन्सबद्दल काय म्हणाले महिंद्रा...
तुम्ही किती तास काम करता या प्रश्नाचं उत्तर देताना आनंद महिंद्रा म्हणाले, मी किती तास काम करतो, यापेक्षा मला कामाच्या गुणवत्तेवर प्रश्न विचारला हवा. ते पुढे म्हणाले, आपल्याकडे चुकीच्या दिशेने चर्चा सुरू आहे. तासांपेक्षा कामाच्या गुणवत्तेवर चर्चा व्हायला हवी.
नक्की वाचा - Larsen And Toubro : घरी बसून बायकोला किती वेळ बघत बसणार ? 90 तास काम करा! L&T चेअरमन यांचा सल्ला
आठवड्याला 90 तास म्हणजे दिवसाला तब्बल 15 तास काम करा असं लार्सन अॅन्ड टुब्रोचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुब्रमण्यन म्हणाले. याशिवाय ते असंही म्हणालेत की रविवारी घरी बसून बायकोचं तोंड किती वेळ बघणार?..त्यापेक्षा कामावर या..एल अॅन्ड टी या इन्फ्रा प्रोजेक्ट हाताळणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांसोबत एका संवाद कार्यक्रमांत त्यांनी हे वक्तव्य केलंय. पण त्यांच्या या वक्तव्यानंतर नेटीझन्सनी त्यांना लक्ष्य केलंय.इतक्या जबाबदार पदावरील व्यक्तीने जाहीरपणे अशी बेजबाबदार वक्तव्य करणं योग्य आहे का? असा सवाल काहींनी केलाय. तर काहींनी थेट सुब्रमण्यन आणि एलअॅन्डटीचे कर्मचारी यांच्या गेल्या दहा वर्षांतल्या पगाराची तुलनाच केलीय.
सुब्रमण्यन यांच्यापुर्वी इन्फोसिसचे सर्वेसर्वा नारायण मूर्ती यांनीही आठवड्याला कामाचे किमान 70 सरासरी तास असावेत, अशा स्वरूपाचं वक्तव्य केलं होतं. पण उत्तम वर्क अॅन्ड लाईफ बॅलन्स साधण्यासाठी खरंच इतके तास काम करणं गरजेचं आहे का? कामाच्या तासांबाबत जागतिक मानकं काय आहेत?
नक्की वाचा - Property Law : मुलाच्या संपत्तीवर आई-वडिलांचा अधिकार असतो? काय सांगतो कायदा?
अमेरिकेच्या कायद्यातल्या फेअर लेबर स्टँडर्ड्स अॅक्ट 1938 नुसार, आठवड्याला सरासरी 40 तास काम करणं पुरेसं आहे, त्यावर काम केल्यास ते तास ओव्हरटाईम म्हणून गणले जावेत. तसंच या ओव्हरटाईमचं पगार नियमित पगाराच्या दीडपट असावा. खरंतर प्रगत देशांच्या तुलनेत भारतीय कर्मचारी सरासरी अधिक तास काम करत असल्याची बाब समोर आलीय. देशनिहाय कामाच्या तासांची तुलना केली असता
भूतान - 54.4 तास
युएईमध्ये - 52 तास
पाकिस्तान - 46.6 तास
भारतीय कर्मचारी आठवड्याला सरासरी 46.7 तास काम करतात
बांगलादेश - 46 तास
इजिप्त - 45 तास
अमेरिका - 38 तास
जपान - 36
युके - 35.9 तास
ऑस्ट्रेलिया - 32.3 तास
कॅनडा - 32.1 तास
नेदरलॅन्ड - 31.6 तास