Apple CEO Tim Cook Salary: जगात काही नोकऱ्या अशा आहेत, ज्या प्रत्येक व्यक्तीची 'ड्रीम जॉब' (Dream Job) असते. गुगल, मायक्रोसॉफ्ट, ॲपल (Apple) अशा मोठ्या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचेच पॅकेज (Package) कोट्यवधी रुपयांचे असते. अशा परिस्थितीत, या कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना (CEO) किती पगार मिळत असेल, याची उत्सुकता अनेकांना असते. आयफोन (iPhone) बनवणाऱ्या ॲपल कंपनीचे सीईओ टिम कुक (Tim Cook) यांच्या पगाराची आकडेवारी समोर आली असून, त्यांच्या एका दिवसाच्या कमाईत तब्बल चार फॉर्च्युनर खरेदी करु शकाल. किती आहे त्यांचा पगार? वाचा...
पगारात 18 टक्क्यांची वाढ..
जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या कंपन्यांपैकी एक असलेल्या ॲपलच्या सीईओंची कमाई अनेक प्रकारे होते. पण, कंपनीकडून त्यांना एक मोठी मासिक (आणि वार्षिक) पगार देखील दिला जातो. नुकतेच टिम कुक यांच्या पगारात 18 टक्क्यांची वाढ (18% hike) करण्यात आली होती. 18 टक्के वाढ म्हणजे काही फार मोठी नाही, असे तुम्हाला वाटू शकते; पण जेव्हा तुम्ही ही वाढ रुपयात रूपांतरित कराल, तेव्हा तुमच्या आयुष्याची संपूर्ण कमाई देखील या वाढीएवढी नसेल.
Bharat Taxi: ओला, उबरची मनमानी संपणार! 'भारत टॅक्सी' दणका द्यायला सज्ज
वार्षिक कमाईने पार केला 600 कोटींचा टप्पा
टिम कुक यांच्या कमाईचे आकडे थक्क करणारे आहेत. 2023 मध्ये त्यांची एकूण कमाई सुमारे 544 कोटी (63.2 दशलक्ष) इतकी होती. पगारात झालेल्या वाढीनंतर त्यांची एकूण कमाई 643 कोटी (सुमारे 74.6 दशलक्ष) पर्यंत पोहोचली आहे. म्हणजेच, एकाच वर्षात टिम कुक यांच्या पगारात जवळपास १०० कोटी रुपयांची वाढ झाली आहे! विशेष म्हणजे, 2022 मध्ये त्यांची वार्षिक कमाई 100 दशलक्ष डॉलरपर्यंत पोहोचली होती. मात्र, भागधारकांच्या (Shareholders) दबावानंतर त्यांनी स्वतःच आपला पगार कमी करून घेतला होता.
एका दिवसाची कमाई किती?
ॲपलच्या सीईओंच्या वार्षिक कमाईबद्दल आपल्याला माहिती मिळालीच आहे, पण ते एका दिवसात किती कमावतात, हे जाणून घेणे अधिक रंजक आहे. टिम कुक यांची एका दिवसाची कमाई सुमारे एक कोटी 76 लाख रुपयांपेक्षा (₹1.76 Crore) जास्त आहे. हा आकडा केवळ त्यांच्या पगाराचा (Salary) भाग आहे. या व्यतिरिक्त, टिम कुक इतर स्त्रोतांकडूनही (Other Sources) चांगली कमाई करतात. थोडक्यात, ॲपलच्या सीईओंची कमाई तुमच्या कल्पनेपेक्षाही अनेक पटीने जास्त आहे आणि याच कारणामुळे ॲपलमध्ये नोकरी मिळवणे हे जगभरातील तरुणांचे 'स्वप्न' असते.
Carbide Gun Threat: काय आहे 'कार्बाइड गन'? ज्यामुळे लहान मुलांचे डोळे होतायेत निकामी
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world