जाहिरात

Bharat Taxi: ओला, उबरची मनमानी संपणार! 'भारत टॅक्सी' दणका द्यायला सज्ज

भारत टॅक्सी ही देशातील पहिली सहकारी टॅक्सी सेवा असेल. डिसेंबरमध्ये ही सेवा मोठ्या प्रमाणात सुरू होणार असली तरी, नोव्हेंबरमध्ये दिल्लीमध्ये तिचा पायलट प्रोजेक्ट सुरू होणार आहे. या पायलट प्रोजेक्टमध्ये 650 चालक/वाहन मालक सहभागी होतील.

Bharat Taxi: ओला, उबरची मनमानी संपणार! 'भारत टॅक्सी' दणका द्यायला सज्ज
Bharat Taxi

OLA, Uber सारख्या अॅप बेस्ट टॅक्सी सर्व्हिसबाबत प्रवाशांच्या अनेक तक्रारी असतात. कार अस्वच्छ असते, जास्तीचे भाडे  आकारले जाते, राईड कॅन्सल केल्या जातात अशा अनेक समस्यांचा प्रवाशांना सामना करावा लागतो. मात्र या अशा अनेक तक्रारींचा निवारण करण्यासाठी सरकारने 'भारत टॅक्सी' ही सेवा सुरु केली आहे. 

ओला आणि उबर सारख्या खाजगी कॅब सेवा कंपन्यांसाठी हे एक मोठे आव्हान ठरू शकते. कारण कार मालक आणि चालकांना कंपनीला कोणतेही कमिशन द्यावे लागणार नाही, म्हणजेच ते संपूर्ण उत्पन्न खिशात घालतील. परिणामी ते ओला, उबर किंवा इतर कॅब सेवांपेक्षा भारत टॅक्सी निवडतील.  

भारत टॅक्सी ही देशातील पहिली सहकारी टॅक्सी सेवा असेल. डिसेंबरमध्ये ही सेवा मोठ्या प्रमाणात सुरू होणार असली तरी, नोव्हेंबरमध्ये दिल्लीमध्ये तिचा पायलट प्रोजेक्ट सुरू होणार आहे. या पायलट प्रोजेक्टमध्ये 650 चालक/वाहन मालक सहभागी होतील.

डिसेंबरपासून ही सेवा विस्तारणार असून हळूहळू देशभरातील इतर शहरांमध्ये उपलब्ध होईल. डिसेंबरपर्यंत अंदाजे 5000 ड्रायव्हर्स या सेवेत सामील होतील आणि विविध शहरांमध्ये जनतेची सेवा करण्यासाठी त्यांच्या वाहनांसह उपलब्ध असतील, अशी माहिती आहे. 

(नक्की वाचा-  Islampur Rename: सांगलीतील इस्लामपूर शहराचं नाव बदललं; केंद्र सरकारची 'या' नावाला मान्यता)

प्रवाशांना काय सुविधा मिळणार?

  • ओला, उबरप्रमाणे भाड्याची लूट थांबवली जाईल. भाडे निश्चित आणि वाजवी असेल.
  • कॅब सुरक्षा ही एक मोठी समस्या आहे, म्हणून 'भारत टॅक्सी' पोलिस ठाण्यांशी देखील कनेक्ट केली जाईल आणि त्यात एक डिस्ट्रेस बटण समाविष्ट केले जाईल. आपत्कालीन परिस्थितीत लाल बटण दाबल्याने जवळच्या पोलिस ठाण्याला अलर्ट मिळेल.
  • ड्रायव्हर्सना कमिशनऐवजी सबस्क्रिप्शन फी आकारली जाईल. ड्रायव्हर्सना प्रत्येक राईडमधून मिळणाऱ्या कमाईच्या 100% रक्कम मिळेल. त्यांना फक्त दैनिक, साप्ताहिक किंवा मासिक शुल्क भरावे लागेल.
  • महिला चालक देखील यात सामील होतील. पहिल्या टप्प्यात 100 महिला सामील होतील. 2030 पर्यंत त्यांची संख्या 15,000 पर्यंत पोहोचेल. 
Latest and Breaking News on NDTV

भारत टॅक्सी कशी काम करेल?

भारत टॅक्सी ही केंद्र सरकारच्या सहकार मंत्रालय आणि राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स विभाग (NeGD) यांनी संयुक्तपणे विकसित केली आहे. केंद्राने  टॅक्सी कोऑपरेटिव्ह लिमिटेड सोबत एक सामंजस्य करार केला आहे. ती खाजगी कंपनी म्हणून नव्हे तर सहकारी कंपनी म्हणून काम करेल. त्यामुळे, चालक देखील सह-मालक असतील. 

(नक्की वाचा-  Pimpri Chinchwad: बायकोला नगरसेवक बनवायचे होते, तिनेच घात केला; नवऱ्याची गळा आवळून हत्या, कारण...)

भारत टॅक्सी सेवा कशी वापरणार?

भारत टॅक्सीची सेवा वापरणे ओला किंवा उबर अॅप वापरण्याइतकेच सोपे आहे. अँड्रॉइड युजर्सना गुगल प्ले स्टोअरवरून "भारत टॅक्सी" अॅप इंस्टॉल करावे लागेल, तर आयफोन युजर्सना ते अॅपल स्टोअरवरून इंस्टॉल करावे लागेल. हिंदी, इंग्रजी, गुजराती आणि मराठी भाषेमध्ये हे अॅप उपलब्ध असेल, असं बोललं जात आहे. ही सेवा दिल्ली, मुंबई, पुणे, भोपाळ, लखनौ आणि जयपूरसह 20 शहरांमध्ये विस्तारित केली जाईल असे वृत्त आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com