Bharat Taxi App: 'भारत टॅक्सी'चे भाडे किती असेल? Ola,Uber पेक्षा स्वस्त आहे का ? सगळी उत्तरं एका क्लिकवर

Bharat Taxi Service: या टॅक्सी सेवेचा लाभ घेणाऱ्या ग्राहकांना सुरुवातीच्या 4 किलोमीटरसाठी तुम्हाला 30 रुपये द्यावे लागतील.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

पीक अवर्समध्ये ऑफिसला जाण्यासाठी टॅक्सी बुक करताना किंवा लोकल ट्रेन बंद पडल्यानंतर कॅब बुक करताना प्रवाशांना भयंकर मनस्ताप सहन करावा लागतो. अनेकदा टॅक्सीवाले भाडी स्वीकारत नाही किंवा ते परिस्थितीचा फायदा उचलत भरमसाठ पैसे घेतात. भारत टॅक्सी सेवेमुळे प्रवाशांची या कटकटीतून सुटका होणार आहे.  केंद्र सरकारच्या मदतीने 'भारत टॅक्सी' (Bharat Taxi) ही नवीन कॅब सेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेचे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये भाडे निश्चित असणार आहे. पाऊस असो किंवा ट्रॅफिकची गर्दी, हे भाडे कधीही बदलणार नाही. या सेवेमुळे प्रवाशांना रास्त दरात टॅक्सी सेवा मिळेल तर दुसऱ्या बाजूला चालकांना त्यांच्या कामाचा संपूर्ण मोबदला मिळेल. 

'फिक्स्ड फेअर' सिस्टम म्हणजे काय?

भारत टॅक्सीमध्ये 'फिक्स्ड फेअर' सिस्टम असेल. म्हणजे तुम्ही जेवढ्या अंतराचा प्रवास कराल, तेवढेच भाडे द्यावे लागेल. या टॅक्सी सेवेचा लाभ घेणाऱ्या ग्राहकांना सुरुवातीच्या 4 किलोमीटरसाठी तुम्हाला 30 रुपये द्यावे लागतील. त्यानंतर 12 किलोमीटरपर्यंतच्या प्रवासासाठी प्रति किलोमीटर 23 रुपये दर असेल. जर तुमचा प्रवास 12 किलोमीटरपेक्षा जास्त असेल, तर पुढच्या प्रत्येक किलोमीटरसाठी फक्त 18 रुपये आकारले जातील.  

नक्की वाचा: Bharat Taxi App: चालक होणार मालक, ग्राहक होणार खूश; भारत टॅक्सी सेवा मुंबई-पुण्यात सुरू होणार का ?

असे असेल भाड्याचे गणित

Base Fare:  तुम्ही प्रवासाला सुरुवात केल्यानंतर पहिल्या 4 किलोमीटरसाठी तुम्हाला फिक्स 30 रुपये द्यावे लागतील.
4 ते 12 किमी : 4 किलोमीटरचा प्रवास पूर्ण झाल्यावर, पुढच्या प्रत्येक किलोमीटरसाठी 23 रुपये या दराने भाडे आकारले जाईल.
12 किमीच्या पुढे : जर तुमचा प्रवास 12 किलोमीटरपेक्षा जास्त असेल, तर 12 किलोमीटर नंतरच्या प्रत्येक किलोमीटरसाठी फक्त 18 रुपये लागतील. म्हणजेच प्रवास जेवढा लांब, 

Bharat Taxi च्या भाड्याचा हिशोब कसा करायचा?  

मुंबई ते पुणे हे अंतर 155 किलोमीटरचे आहे. या अंतरासाठी किती रुपये होतील हे आम्ही ठरवून दिलेल्या भाड्यानुसार आकडेमोड करून जाणून घेण्याचा प्रयत्न केला. 

Advertisement
  • पहिले 4 किमी (फिक्स): 30 रुपये
  • ​पुढचे 8 किमी - 8 किलोमीटर X 23 रुपये = 184 रुपये
  • ​उर्वरित अंतर हे 143 किमीचे आहे. 12 किलोमीटरच्या पुढील अंतरासाठी प्रत्येक किलोमीटरला 18 रुपये खर्च येईल. या हिशोबाने   
  • ​143 किमी X  18 रुपये = 2,574 रुपये

​एकूण अंदाजित भाडे: 30 + 184 + 2,574 = 2,788 रुपये.

नक्की वाचा: Mumbai Pune Expressway:...आता या अडचणीला नेहरू जबाबदार आहेत,एवढं म्हणू नका; विरोधी नेत्याने सुनावले खडेबोल

या पद्धतीमुळे प्रवाशाला आधीच कल्पना येते की त्याला किती पैसे द्यावे लागणार आहेत. ट्रॅफिकमध्ये गाडी कितीही वेळ थांबली तरी या भाड्यात वाढ होत नाही, हे या सेवेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे.