जाहिरात

Bharat Taxi App: चालक होणार मालक, ग्राहक होणार खूश; भारत टॅक्सी सेवा मुंबई-पुण्यात सुरू होणार का ?

ओला-उबर सारख्या कंपन्या प्रवाशांच्या भाड्यातून मोठे कमिशन कापून घेतात, परंतु भारत टॅक्सीसेवेचा वापर करणाऱ्या प्रवाशाने दिलेले पैसे हे पूर्णपणे चालकाच्या खात्यात जमा होतील.

Bharat Taxi App: चालक होणार मालक, ग्राहक होणार खूश; भारत टॅक्सी सेवा मुंबई-पुण्यात सुरू होणार का ?
नवी दिल्ली:

Bharat Taxi Cab Service Launch: ॲप बेस्ड कॅब क्षेत्रात आतापर्यंत खासगी कंपन्यांच कार्यरत होत्या, मात्र आता केंद्र सरकारही या क्षेत्रात उतरलं असून, आज या सेवेचा शुभारंभ होणार आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते 'भारत टॅक्सी' या नवीन कॅब सेवेचा शुभारंभ होणार आहे. Ola, Uber, Rapido सारख्या खासगी कंपन्यांच्या मक्तेदारीला आव्हान देण्यासाठी केंद्र सरकारने हे पाऊल उचलले आहे. दिल्लीत ही सेवा प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली होती. त्याला यश मिळाल्यानंतर ही सेवा मुंबई, पुणे, जयपूर, लखनौ आणि भोपाळसह देशातील 20 प्रमुख शहरांमध्ये सुरू केली जाणार आहे. या सेवेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे मागणी जास्त असताना प्रवाशांवर अतिरिक्त दर लादला जाणार नाही. 

नक्की वाचा: बायकोला एका डोळ्याने दिसेना, पती कोर्टात गेला, न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला

चालक नाही तर मालक! ड्रायव्हरनाही होणार फायदा

भारत टॅक्सी ही सेवा केंद्र सरकारचे सहकार मंत्रालय आणि नॅशनल ई-गव्हर्नन्स डिव्हिजन (NeGD) यांनी संयुक्तपणे विकसित केली आहे. यासाठी 'सहकार टॅक्सी को-ऑपरेटिव्ह लिमिटेड' या संस्थेसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. खासगी कंपन्यांसारखी ही सेवा नसणार आहे. ही सेवा सहकारी संस्थेच्या (Co-operative) माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यामुळे यामध्ये टॅक्सी चालवणारे चालक हे केवळ कर्मचारी नसून ते या संस्थेचे मालकही असतील. या सेवेतील चालकांना 'सारथी' असे संबोधले जाणार आहे. अमूल या जगप्रसिद्ध सहकारी संस्थेचे एमडी जयेन मेहता यांच्या अध्यक्षतेखालील कौन्सिल या संपूर्ण उपक्रमाचे संचलन करणार आहे.

पवरून बुक करता येणार रिक्षा,टॅक्सी, बाईक

अँड्रॉइड आणि आयफोन युजर्स प्ले स्टोअरवरून 'भारत टॅक्सी' हे ॲप डाऊनलोड करू शकतील. हे ॲप हिंदी, इंग्रजीसह मराठी आणि गुजराती भाषेतही उपलब्ध असणार आहे. यामध्ये प्रवाशांना टॅक्सीसोबतच ऑटो आणि बाईक सेवा देखील निवडता येईल. खाजगी टॅक्सी कंपन्या पाऊस, वाहतूक कोंडी किंवा ऑफिसच्या वेळेत अव्वाच्या सव्वा भाडे आकारतात, मात्र भारत टॅक्सीमध्ये अशी कोणतीही 'सर्ज प्रायसिंग' नसेल. यामुळे प्रवाशांची आर्थिक पिळवणूक थांबेल.

नक्की वाचा: कोडिंगचं काम जमलं नाही; हैदराबादमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअरची आत्महत्या, 2 महिन्यांपूर्वीच लागली होती नोकरी

प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य

ओला-उबर सारख्या कंपन्या प्रवाशांच्या भाड्यातून मोठे कमिशन कापून घेतात, परंतु भारत टॅक्सीसेवेचा वापर करणाऱ्या प्रवाशाने दिलेले पैसे हे पूर्णपणे चालकाच्या खात्यात जमा होतील. चालकांना या सेवेत सहभागी होण्यासाठी एक नाममात्र शुल्क द्यावे लागेल. हे शुल्क दैनंदीन, आठवडी किंवा मासिक स्वरुपाचे असेल. याशिवाय चालकांना अपघात विमा , कौटुंबिक आरोग्य विम्याचा लाभही दिला जाणार आहे.  या सेवेत सहभागी होणाऱ्या सगळ्या चालकांचे पोलीस व्हेरिफिकेशन अनिवार्य करण्यात आले आहे. ॲपमध्ये सुरक्षेसाठी 'लाईव्ह लोकेशन शेअरिंग' आणि आणीबाणीच्या प्रसंगात मदतीसाठी 'SOS' बटण देण्यात आले आहे. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com