Mumbai Pune Expressway Tanker Accident: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर मंगळवारी (3 फेब्रुवारी) आडोशी बोगद्याजवळ ज्वलनशील प्रोपलेन गॅस वाहतूक करणारा टँकर उलटला. संध्याकाळ 5 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अपघातानंतर टँकरमधून गॅस गळती सुरू झाल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव मुंबईकडे येणारी वाहतूक पूर्णतः थांबवण्यात आली. यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. सलग दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी (5 फेब्रुवारी) देखील परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी आहे. या वाहतूक कोंडीवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करण्यास सुरुवात केलीय. शिवसेनेचे नेते (उबाठा) अंबादास दानवे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X'वर पोस्ट करत सरकार टीका केलीय. अंबादास दावने यांनी पोस्टमध्ये लिहिलंय की, "एक टँकर काय उलटतो आणि राज्यातील दोन महत्त्वाच्या शहरांचा संपर्क २४ तासांसाठी तुटतो. व्वा! काय ही व्यवस्थेची अवस्था. उद्या आपत्कालीन परिस्थतीत असली शरम ओढवण्यापेक्षा यावर शक्ती(पीठ)मॅन ने उपयोजना करायला हव्यात! फक्त आता या अडचणीला नेहरू जबाबदार आहेत, एवढं म्हणू नका बस..."
(नक्की वाचा: Pune Mumbai Expressway: एक्स्प्रेस वेवर महाभीषण वाहतूक कोंडी; तब्बल 20 कोटींचे नुकसान, हजारो प्रवासी अडकले)
अंबादास दानवे यांची X पोस्ट
एक टँकर काय उलटतो आणि राज्यातील दोन महत्त्वाच्या शहरांचा संपर्क २४ तासांसाठी तुटतो. व्वा! काय ही व्यवस्थेची अवस्था. उद्या आपत्कालीन परिस्थतीत असली शरम ओढवण्यापेक्षा यावर शक्ती(पीठ)मॅन ने उपयोजना करायला हव्यात! फक्त आता या अडचणीला नेहरू जबाबदार आहेत, एवढं म्हणू नका बस..… pic.twitter.com/NysP98EwB1
— Ambadas Danve (@iambadasdanve) February 5, 2026
(नक्की वाचा: Expressway traffic jam: पुणे एक्सप्रेस वे वाहतूक कोंडीचा फटका ST ला, जाणून घ्या किती फेऱ्या झाल्या रद्द)
टोल परत केला पाहिजे: राज ठाकरे
दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही ज्या प्रवाशांकडून या काळात टोल वसूल केला गेला तो सरकारने त्यांना परत केला पाहिजे, अशी मागणी केलीय. तसेच चौकशांचा फार्स न करता या घटनेसकट इतर काय घटना घडू शकतात आणि त्यावर तात्काळ उपाय कसा केला जाऊ शकतो याचा कृती आराखडा तयार करून लोकांसमोर ठेवला पाहिजे. सरकारमध्ये पालकमंत्री असतात आणि या सरकारमध्ये तर पालकमंत्री पदावरून वाद सुरू असतात. पालकत्वाची इतकी आस असलेलं सरकार असून सुद्धा नागरिकांना निराधार वाटावं अशी परिस्थिती का येत आहे याचा सरकारने विचार करावाच, असेही राज ठाकरे यांनी म्हटलंय.
राज ठाकरे यांची X पोस्ट
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले महत्त्वाचे निर्देशमुंबई-पुणे द्रुतगती मार्ग जवळपास ३२ तास ठप्प होता. प्रवाशांचे कमालीचे हाल झाले. आणि यानंतर नेहमीप्रमाणे सरकारकडून या प्रकरणाच्या फक्त चौकशीचे आदेश दिले गेले. या आणि अशा अनेक घटनांच्या अनेक चौकश्या होतात. पुढे त्यातून काही बोध सरकार, प्रशासन घेतं का? हा प्रश्न आहे.
— Raj Thackeray (@RajThackeray) February 5, 2026
मंगळवार ३… pic.twitter.com/2RA5yxOG0Z
मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील अपघात आणि त्यामुळे झालेल्या वाहतूककोंडीमुळे वाहन चालकांना झालेल्या त्रासाची गंभीर दखल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. या पुढील काळात अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी विशेष आपत्कालीन वाहतूक आराखडा मुंबई पुणे द्रुतगती महामार्गासाठी तयार करण्याचे निर्देश एमएसआरडीसी त्याचप्रमाणे पोलिसांना देण्यात आले आहेत.
गॅस टँकर उलटल्यामुळे ज्वलनशील प्रोपोलीन गॅसची गळती सुरू झाली होती. या गळतीमुळे धोका आणखी वाढून मोठे नुकसान झाले असते त्यामुळे वाहतुकीचे नियोजन करण्याशिवाय पर्यायच नव्हता. त्यामुळे द्रुतगती महामार्गावरील वाहतूक जुन्या महामार्गाकडे वळवावी लागली. शिवाय एमएसआरडीसी आणि पोलिसांनी अथक 20 तास प्रयत्न करून गॅस गळती सुद्धा रोखली असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world