Stock Market Crash: ब्लॅक मंडे! भारतीय शेयर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स 3000 तर निफ्टी 1000 अंकांनी खाली

Stock Market Crash: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाचा फटका भारतीय शेअर बाजाराला बसला आहे. ट्रम्प यांनी लादलेल्या मोठ्या आयात करांना प्रत्युत्तर म्हणून चीननेही अमेरिकेवर कडक आयात शुल्क लादले.

जाहिरात
Read Time: 2 mins
Stock Market Crash:

Share market Collapse : ट्रम्प टॅरिफने भारतीय शेअर बाजाराला हादरे बसले आहेत. आज 8 एप्रिल रोजी भारतीय शेअर बाजार मोठ्या घसरणीसह उघडले. सेन्सेक्स 3100 अंकानी खाली आला आहे. तर निफ्टी 1000 अंकांनी घसरुन  21,900 च्या खाली आला आहे. सेक्टोरल इंडेक्स  8 टक्क्यांपर्यंत घसरले आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

जपान, हाँगकाँग आणि ऑस्ट्रेलियासारख्या मोठ्या बाजारपेठांमध्ये मोठी घसरण नोंदवली गेली. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे टॅरिफ धोरण. ट्रम्प यांनी लादलेल्या मोठ्या आयात करांना प्रत्युत्तर म्हणून चीननेही अमेरिकेवर कडक आयात शुल्क लादले. या व्यापार युद्धाच्या भीतीमुळे जगभरातील गुंतवणूकदार घाबरले आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात शेअर्स विकण्यास सुरुवात केली.

( नक्की वाचा- Share Market Today : शेअर बाजार धडाम, गुंतवणूकदारांनी 18 लाख कोटी गमावले; घसरणीची 5 कारणे)

निफ्टीच्या 50 स्टॉक्सपैकी 49 स्टॉक्स लाल रंगात ट्रेड करत आहे. इन्फोसिस 10 टक्के खाली आहे, टाटा मोटर्स 6 टक्के, टाटा स्टील  10 टक्के आणि टाटा स्टील 10 टक्के घसरून लोअर सर्किटला पोहोचले आहेत.

(नक्की वाचा-  Shirdi News : फाड-फाड इंग्रजी, डोळ्यात पाणी; शिर्डीत भीक मागताना सापडला ISRO चा अधिकारी)

सर्वाधिक घसरलेले स्टॉक्स

  • ट्रेन्ट - (-17.68 टक्के)
  • टाटा मोटर्स -  (-9.99 टक्के) 
  • टाटा स्टिल - (-9.49 टक्के) 
  • एटसीएल टेक - (-6.84 टक्के) 
  • ओएनजीसी - (-6.64 टक्के)
  • जेएसडब्ल्यू - (-6.47 टक्के) 
  • श्रीराम फायनास्स - (-6.26 टक्के)
  • हिंडाल्को - (-6.14 टक्के)
  • बजाज ऑटो (-5.66 टक्के)
  • एल अँड टी - (-5.58 टक्के)

Topics mentioned in this article