BSE Share: अबब! 6861% टक्के रिटर्न्स!! या धमाकेदार शेअरमध्ये अजून गुंतवणुकीची संधी आहे ?

BSE Dividend : बीएसईच्या स्थापनेला 150 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल गुंतवणूकदारांना खास भेट दिली आहे. कंपनीने प्रति शेयर 5 रुपये विशेष लाभांश आणि त्यासोबत 18 रुपये अंतिम लाभांश जाहीर केला आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
वाचा

बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा शेअर गेल्या 5 वर्षांत 6861.18% परतावा देऊन गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर ठरला आहे. मार्च 2025 च्या तिमाहीत नफा 5 पटींनी वाढला आहे, तरीही एनएसईच्या प्रस्तावामुळे आव्हाने आहेत.

आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली? आम्हाला नक्की कळवा.
मुंबई:

आशियातील सर्वात जुना स्टॉक एक्सचेंज असलेला बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा शेअर (BSE Share Price) गेल्या काही वर्षांत गुंतवणूकदारांसाठी एक शानदार मल्टीबॅगर स्टॉक बनला आहे. गेल्या 5 वर्षांत बीएसईच्या शेयरने तब्बल 6861.18% परतावा दिला आहे. म्हणजेच, जर तुम्ही 2019 मध्ये बीएसईच्या शेअरमध्ये तुम्ही 10 हजार रुपये गुंतवले असते, तर आज त्याची किंमत आज सुमारे 7 लाख रुपये झाली असती. म्हणजेच जर 2019 मध्ये तुम्ही या शेअरमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर त्याची किंमत आज 70  लाख रुपयांच्या जवळपास असती.

दमदार कामगिरी

BSE ने अलिकडील काही महिन्यांतही जबरदस्त परतावा दिला आहे. फक्त या वर्षाबाबत म्हणजेच 2025 बद्दल बोलायचे झाल्यास या शेअरने  56.24% परतावा दिला आहे. शेअर बाजारात या शेअरबद्दल अजूनही सकारात्मक दृष्टीकोण आहे.  ब्लूमबर्गने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, 14 पैकी 10 विश्लेषकांनी बीएसईला ‘बाय' रेटिंग दिली आहे म्हणजेच हा शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. 3 जणांनी हे  शेअर असल्यास ‘होल्ड' करा असा सल्ला दिला आहे तर फक्त 1 विश्लेषकाने हा शेअर विकण्याचा सल्ला दिला आहे.  ‘द स्ट्रीट'चे संस्थापक कुणाल रामभिया यांनीही बीएसईच्या शेअर बाबत आपला सकारात्मक दृष्टिकोन असल्याचे म्हटले आहे.

Advertisement

नक्की वाचा : गुंतवणूक करण्याचे 4 बेस्ट पर्याय, तज्ज्ञ काय सांगतात एकदा पाहाच 

तिमाही निकालांत दमदार कामगिरी

सगळ्या कंपन्या आपले तिमाही निकाल प्रसिद्ध करत असतात. यातून त्या कंपनीला झालेला फायदा किंवा तोटा याबद्दलची माहिती मिळत असते. बीएसईनेही आपले तिमाही निकाल प्रसिद्ध केले आहेत.  मार्च 2025 च्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 5 पटींनी वाढून 494 कोटी रुपये झाला आहे.तज्ज्ञ मंडळींनी बीएसईच्या कामगिरीबाबत जे अंदाज वर्तवले होते ते सगळे अंदाज चुकीचे ठरवत बीएसईने दमदार कामगिरी केली आहे.  कंपनीचा संचालन महसूल 75% वाढून 856.6 कोटी रुपये झाला आहे. बीएसईमध्ये व्यवहारांचे प्रमाण गेल्या काही महिन्यांमध्ये लक्षणीय प्रमाणात वाढले आहे त्याचजोडीने व्यवहारासाठीच्या शुल्कातून मिळणारे उत्पन्नही वाढले आहे.  

Advertisement

नक्की वाचा : जून महिन्यात हे 10 नियम बदलणार! तुमच्या खिशावर कसा परिणाम होणार? जाणून घ्या

150वर्षे पूर्ण झाल्याबद्दल  विशेष डिव्हिडंड

बीएसईच्या स्थापनेला 150 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल गुंतवणूकदारांना खास भेट दिली आहे. कंपनीने प्रति शेयर 5 रुपये विशेष लाभांश आणि त्यासोबत 18 रुपये अंतिम लाभांश जाहीर केला आहे. BSE चा शेअर 10 जून रोजी 3009 रुपयांवर खुला झाला होता. काल हा शेअर 2994 रुपयांवर बंद झाला होता. मंगळवारी या शेअरच्या किंमतीने वरच्या बाजूस 3030 रुपयांच्या पातळीला स्पर्श केला होता.  तर खालच्या बाजूस 2975 रुपयांच्या पातळीला स्पर्श केला होता. 

Advertisement

बीएसईसमोर काही आव्हाने देखील आहेत गुंतवणूकदारांनी त्यावरही लक्ष ठेवणे गरजेचे आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंजने (एनएसई) इक्विटी डेरिव्हेटिव्हजच्या एक्स्पायरी डेट मंगळवार आणि गुरुवार अशा करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. सध्या मंगळवार ही बीएसईची विशेष एक्स्पायरी डेट आहे, ज्यामुळे त्यांना फायदा होतो. जर हा प्रस्ताव मंजूर झाला, तर बीएसईचा हा फायदा कमी होऊ शकतो. एकूण परिस्थिती पाहिल्यास बीएसईचा शेअर हा गुंतवणूकदारांसाठी आकर्षक ठरतो आहे. कोणतीही गुंतवणूक करत असताना आपण गुंतवणूक सल्लागाराच्या मदतीनेच ती करावी ही सगळ्या वाचकांना विनंती. ही बातमी गुंतवणूकदारांना माहिती मिळावी या उद्देशाने प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. 

Topics mentioned in this article