नवी दिल्ली:
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Union Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी आज संसदेत अर्थसंकल्प (Budget 2024) सादर करीत महिलांसाठी मोठ्या घोषणा केल्या. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात महिलांवर अधिक लक्ष केंद्रीत करण्यात आलं.
महिलांना बजेटमध्ये काय काय मिळालं?
- अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितलं की, सरकार महिलांच्या निवासी मालमत्तांच्या खरेदीवर शुल्क कमी करण्याचा आणि शहरी विकास योजनांचा एक अनिवार्य घटक करण्याचा विचार करणार आहे. सीतारमण यांनी 2024-25 चा अर्थसंकल्प सादर करताना सांगितलं की, सरकार महिलांनी खरेदी केलेल्या संपत्तीचं शुल्क कमी करणाऱ्या राज्यांना प्रोत्साहन देतील.
- विविध कार्यक्षेत्रात महिलांचा भाग वाढविण्याच्या योजनेचा उल्लेख केला. निर्मला सीतारमण म्हणाले, विविध कार्यक्षेत्रांमध्ये महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी नोकरदार महिला वर्गासाठी वसतिगृहाची स्थापना करणार.
- महिला आणि मुलींना लाभ देणाऱ्या योजनांसाठी तीन लाख कोटींची तरतूद.
- निर्मला सीतारमण यांनी महिलांनी प्रॉपर्टी खरेदी केल्यास रजिस्ट्रीवर स्टँप ड्यूटीमध्ये सूट देण्याचं राज्याला आवाहन केलं आहे.
नक्की वाचा - Budget 2024 Live Updates : नव्या कर प्रणालीनुसार 'टॅक्स स्लॅब'मध्ये बदल
आगामी अर्थसंकल्प 2024 सालातील 9 प्राधान्यांवर रचले जातील
कृषी उत्पादकता आणि लवचिकता
रोजगार आणि कौशल्य
सुधारित मानवी संसाधने, सामाजिक न्याय
उत्पादन आणि सेवा
शहर विकास, नागरी विकास
ऊर्जा सुरक्षा
पायाभूत सुविधा
नवकल्पना, संशोधन आणि विकास
पुढच्या पिढीतील सुधारणा