जाहिरात

Union Budget 2026: स्मार्टफोन स्वस्त होणार? अर्थमंत्र्यांच्या निर्णयाचा नेमका परिणाम काय? जाणून घ्या किंमती

कच्च्या मालावरील आयात शुल्क शून्यावर आणण्यात आले आहे.

Union Budget 2026: स्मार्टफोन स्वस्त होणार? अर्थमंत्र्यांच्या निर्णयाचा नेमका परिणाम काय? जाणून घ्या किंमती
  • निर्मला सीतारमण यांनी 2026 च्या अर्थसंकल्पात इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिक वाहनांसाठी घोषणा केल्या
  • लिथियम-आयन बॅटरी उत्पादनासाठी लागणाऱ्या 63 कॅपिटल गुड्सवरील कस्टम ड्युटी पूर्णपणे माफ करण्यात आली आहे
  • परदेशातून आणल्या जाणाऱ्या वैयक्तिक सामानावर आकारली जाणारी कस्टम ड्युटी 20 टक्क्यांऐवजी 10 टक्क्यांवर आणली आहे
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
नवी दिल्ली:

Union Budget 2026: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 2026 च्या अर्थसंकल्पात इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या (EV) क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. यामध्ये लिथियम-आयन बॅटरी तयार करण्यासाठी लागणाऱ्या 63 कॅपिटल गुड्सवरील कस्टम ड्युटी पूर्णपणे माफ करण्यात आली आहे. यामध्ये मोबाईल फोन बॅटरीशी संबंधित 28 उपकरणांचा समावेश आहे. या निर्णयामुळे बॅटरीची उत्पादन किंमत कमी होऊन त्याचा थेट फायदा ग्राहकांना मिळण्याची शक्यता आहे.

परदेशातील फोन आता स्वस्त मिळणार आहेत. आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी सरकारने मोठी भेट दिली आहे. वैयक्तिक सामानावर (Personal Baggage) आकारली जाणारी कस्टम ड्युटी 20 टक्क्यांवरून 10 टक्क्यांवर आणली आहे. यामुळे परदेशातून आणलेले आयफोन किंवा सॅमसंगचे प्रिमियम मॉडेल्स आता भारतीय प्रवाशांना स्वस्त पडतील. त्यामुळे परदेशातून आता तुम्ही पाहीजे त्या वस्तू आणू शकता. त्यासाठी फक्त 10 टक्केच कस्टम ड्यूटी द्यावी लागणार आहे. 

नक्की वाचा - Budget 2026: काय स्वस्त? काय महाग? दारू महागली, विमानाचे पार्ट स्वस्त, पाहा संपूर्ण लिस्ट

कच्च्या मालावरील आयात शुल्क शून्यावर आणण्यात आले आहे. कोबाल्ट पावडर, बॅटरी वेस्ट, झिंक आणि लेड यांसारख्या 12 महत्त्वाच्या खनिजांवरील बेसिक कस्टम ड्युटी शून्यावर आणली आहे. यामुळे देशांतर्गत उत्पादन वाढण्यास मदत होईल. तसेच, इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट्स मॅन्युफॅक्चरिंगसाठी 40,000 कोटी रुपयांच्या योजनेचा विस्तार करण्यात आला आहे. मात्र, जागतिक स्तरावर मेमरी चिप्सचा तुटवडा असल्याने किमतीत लगेच मोठी घसरण होईलच असे नाही, असा सूर तज्ज्ञांनी लावला आहे.

नक्की वाचा - Budget 2026 Women: बजेटमध्ये घोषीत केलेलं SHE-Marts काय आहे? कुणाला अन् कसा होणार फायदा?

आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या पर्यटकांसाठी एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. परदेशातून येताना आणल्या जाणाऱ्या वस्तूंवरील कस्टम ड्युटी आता 20 टक्क्यांऐवजी केवळ 10 टक्के असेल. या निर्णयामुळे प्रीमियम स्मार्टफोनच्या किमती कमी होण्याची चिन्हे आहेत. भविष्यातील वाटचाल सरकारने 35 नवीन कॅपिटल गुड्सना बॅटरी मॅन्युफॅक्चरिंगसाठी ड्युटी-फ्री लिस्टमध्ये समाविष्ट केले आहे. तसेच कच्च्या मालावरील टॅक्स कमी केल्याने रिसायकलिंग उद्योगालाही चालना मिळणार आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com