जाहिरात
This Article is From Feb 08, 2026

Trending News: मोदी सरकारकडून बांगलादेशाला कोट्यवधीचं दान? एकीकडे हिंदूवर हल्ले दुसरीकडे मदतीचा हात?

यात त्यांनी नवनिर्वाचीत महापौरांना एक माहिती तर दिलीच आहे पण त्यातून भाजपला टोला ही लगावला आहे.

Trending News: मोदी सरकारकडून बांगलादेशाला कोट्यवधीचं दान? एकीकडे हिंदूवर हल्ले दुसरीकडे मदतीचा हात?
मुंबई:

बांगलादेशमध्ये हिंदूंवर अलीकडच्या काळात हल्ले वाढले आहेत. बांगलादेशमध्ये हिंदू असुरक्षित असल्याचं चित्र आहे. त्या विरोधात देशभरात भाजपने रस्त्यावर उतरून आंदोलन केलं. बांगलादेशीयांना भारतातून हद्दपार करा यासाठी ही भाजप आक्रमक आहे. त्यातच मुंबईच्या नवनिर्वाचीत महापौर  ऋतू तावडे यांनी मुंबईतून बांगलादेशीना हद्दपार करण्याची घोषणा केली आहे. हे होत असतानाच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ती म्हणजे मोदी सरकारने आपल्या अर्थसंकल्पात कोट्यवधींचा निधी बांगलादेशला देवू केल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपाने खळबळ उडाली आहे.  

याबाबस संजय राऊत यांनी ट्वीट केले आहे. यात त्यांनी नवनिर्वाचीत महापौरांना एक माहिती तर दिलीच आहे पण त्यातून भाजपला टोला ही लगावला आहे. ते म्हणतात  मुंबईच्या होणाऱ्या महापौर ऋतू तावडे यांनी मुंबईतून बांगलादेशींना घालण्याची घोषणा केली. छान,फक्त त्यांनी एक करावे पंतप्रधान मोदी यांना दिल्लीत जाऊन विचारावे की कालच्या अर्थ संकल्पात बांगलादेशला कोट्यावधी रुपयांचे दान का दिले? बंगला देशातील हिदू मंदिरांवर हल्ले करण्यासाठी आणि हिंदूंच्या कत्तली करण्यासाठी हे दान दिले काय? असा थेट सवाल करत त्यांनी भाजपचीच कोंडी केली आहे. 

नक्की वाचा - Uddhav Thackeray: उद्धव ठाकरें निवडणुकीच्या मैदानात? विधान परिषदेवर जाण्यासाठी कसोटी लागणार

नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात मोदी सरकारने बांगलादेशसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. असा दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. हा निधी बांगलादेशला दिला जाणार आहे. त्यामुळे हा निधी बांगलादेशला कशासाठी दिला जाणार आहे असा प्रश्न राऊत यांनी केला आहे. एकीकडे बांगलादेशीं विरोधात ओरडायचे. बांगलादेशमध्ये हिंदूवर हल्ले होत आहेत हे सांगायचे. मंदिर पाडली जात आहेत हे ही समोर येत आहे. असं असताना कोट्यवधीचा निधी मोदी सरकार कसे काय देत आहे असा प्रश्न त्यांनी केला आहे. 

नक्की वाचा - Satara News: सह्याद्रीच्या घनदाट जंगलात आणखी एक वाघ, ‘हिरकणी'च्या एन्ट्रीचा दमदार Video

भाजपची मुंबई महापालिके सत्ता आल्यानंतर त्यांनी बांगलादेशीं विरोधात कारवाईचे संकेत दिले आहेत. त्यामुळे आता त्यांच्यावर कारवाई करताना या निधी बाबत भाजपकडून काही स्पष्टीकरण येणार का हा खरा प्रश्न आहे. या प्रकरणातून भाजपचा दुटप्पी पणा समोर येत असल्याचा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला आहे. त्यामुळे भाजपचीच या प्रकरणी कोंडी झाली आहे. जो देश हिंदू विरोधात भूमीका घेत आहे. हिंदूवर हल्ले होत आहेत. त्यांनाच  मदतीचा हात कशासाठी हा खरा प्रश्न निर्माण झाला आहे. 
  

संपूर्ण बातमी वाचा
Listen to the latest songs, only on JioSaavn.com