जाहिरात

हिंडाल्‍कोच्या विरोधात CBI कडून FIR दाखल, पर्यावरणाच्या मंजुरीसाठी भ्रष्टाचाराचा आरोप

सीबीआयनं (CBI) हिंडाल्को (Hindalco) विरोधात पर्यावरणाच्या मंजुरीसाठी भ्रष्टाचार केल्याच्या प्रकरणात खटला दाखल केला आहे.

हिंडाल्‍कोच्या विरोधात CBI कडून FIR दाखल, पर्यावरणाच्या मंजुरीसाठी भ्रष्टाचाराचा आरोप
प्रतिकात्मक फोटो
मुंबई:

सीबीआयनं (CBI) हिंडाल्को (Hindalco) विरोधात पर्यावरणाच्या मंजुरीसाठी भ्रष्टाचार केल्याच्या प्रकरणात खटला दाखल केला आहे. या प्रकरणात पर्यावरण आणि वन विभागाचे तत्कालीन संचालक डॉ. टी. चांदिनी यांच्या विरोधातही केस दाखल करण्यात आली आहे. त्यांच्यावर हिंडाल्को इंडस्ट्रीला गैरमार्गानं फायदा मिळवून देण्याचा आरोप आहे.

हिंडाल्को आदित्य बिर्ला ग्रुपची अ‍ॅल्युमिनियम कंपनी आहे. सीबीआयनं 2016 साली आदित्य बिर्ला मॅनेजमेंट कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड (Aditya Birla Management Corporation Private Limited) आणि पर्यावरण मंत्रालयातील अज्ञात अधिकारींच्या विरोधात प्राथमिक तपास सुरु केला होता. त्या आधारावर ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय आहे प्रकरण?

ABMCPL व्यवस्थापनानं त्यांच्या प्रोजेक्टसाठी 2011-13 च्या दरम्यान पर्यावरण मंत्रालयाच्या अज्ञात अधिकाऱ्यांना मंजुरीसाठी लाच दिली होती, असा या प्रकरणात आरोप आहे. 

सीबीआयच्या FIR नुसार सप्टेंबर 2016 मध्ये जारी केलेल्या अधिसूचनेनुसार केंद्र सरकारकडून पर्यावरण मान्यता देण्यात येणार होती. या अधिसुचनेनुसार सर्व नव्या प्रोजेक्टसाठी पर्यावरण मंजुरी आवश्यक होती. 

केंद्र सरकारनं पर्यावरण मंजुरीसाठी आवश्यक प्रकल्पाचं मुल्यांकन तज्ज्ञ समितीकडून केलं होतं. या समितीमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश होता. 

( नक्की वाचा : दिग्गज सेमीकंडक्टर कंपनीत होणार कर्मचाऱ्यांची कपात, 15,000 जणांची नोकरी जाणार )
 

डॉ. चांदिनींना निर्बंधांची कल्पना होती - CBI

सीबीआयच्या एफआयआरनुसार संबंधित कालावधीमधील तत्कालीन संचालक डॉ. टी. चांदिनी यांना पर्यावरण मंत्रालयाकडून जास्त प्रदुषित क्षेत्रात लावण्यात आलेल्या निर्बंधाची पूर्ण माहिती होती. 

हिंडास्को कंपनी पर्यावरण मंत्रलायाकडून देण्यात येणाऱ्या मंजुरीचं उल्लंघन करण्यापूर्वी अतिरिक्त कोळसा उत्पादन करत होते. या कंपनीला गैरफायदा मिळवून देण्याचा आरोप आहे. डॉ. चांदिनी यांनी तज्ज्ञ मुल्यांकन समितीचे सदस्य बनून हिंडाल्को कंपनीचा फायदा केल्याचा आरोप आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Previous Article
Stock Market : काल जगभरातील बाजारात मंदीचं पडसाद; आज आशियातील बाजारात कशी आहे स्थिती?
हिंडाल्‍कोच्या विरोधात CBI कडून FIR दाखल, पर्यावरणाच्या मंजुरीसाठी भ्रष्टाचाराचा आरोप
Gold prices fell by two thousand rupees per tola Crowd of customers to buy
Next Article
सोन्याच्या दरात 2 हजारांची घसरण, खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी