जाहिरात

Crude Oil Price : भारताचं टेन्शन झालं दूर, कच्च्या तेलाच्या किमती कोसळल्या, आता LPG ची तुटवडा नाही?

अमेरिका आणि इराण यांच्यात शांतता करार होण्याची आशा वाढल्याने सोमवारी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती दोन आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर घसरल्या आहेत.

Crude Oil Price : भारताचं टेन्शन झालं दूर, कच्च्या तेलाच्या किमती कोसळल्या, आता LPG ची तुटवडा नाही?

Crude Oil Price : कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात शांतता करार होण्याची आशा वाढल्याने सोमवारी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती दोन आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर घसरल्या आहेत.

बेंचमार्क ब्रेंट क्रूड फ्युचर्स ४.५५ टक्क्यांनी घसरून प्रति बॅरल ९८.८३ डॉलरवर आले आहे. दरम्यान, यूएस वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट (WTI) क्रूड ४.७३ टक्क्यांनी घसरून प्रति बॅरल ९२.०३ डॉलरवर व्यवहार करत होते. ७ मे नंतरची ही दोन्ही करारांसाठीची नीचांकी पातळी आहे. कच्च्या तेलाच्या किमतीतील ही घसरण भारतासाठी मोठा दिलासा आहे.

भारतासाठी सर्वात दिलासादायक बाब म्हणजे, संभावित शांतता करारामुळे स्ट्रेट ऑफ होर्मुजवरील संकट दूर होऊ शकतं. अमेरिका आणि इराणमधील तणावापूर्वी जगातील तब्बल पाच टक्के तेल आणि एलएनजीचं परिवहन याच मार्गावरुन केला जात होता. या मार्गाच्या सुरळीत कामकाजामुळे भारतातील गॅस आणि तेलाचा पुरवठा अखंडितपणे सुरू राहील, ज्यामुळे देशातील एलपीजी तुटवड्याचा धोका पूर्णपणे टळेल आणि पुरवठा साखळी अधिक मजबूत होईल.

नक्की वाचा - Saving tips : सॅलरी येताच संपते? महागाईत पैसे कसे वाचवाल? 20% बचत होईल; पैसे वाचविण्याच्या सोप्या पद्धती

अमेरिका-इराणमधील शांतता कराराच्या अपेक्षेने किमती घसरल्या...

अमेरिका आणि इराणमधील शांतता कराराच्या अपेक्षेमुळे तेलाच्या किमती घसरल्या आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प य़ांच्या विधानानंतर बाजारात सकारात्मक स्थिती झाली आहे. ट्रम्पने संकेत दिले की, दोन्ही देशांनी एका सामंजस्य करारावरील वाटाघाटी बहुतांश पूर्ण केल्या आहेत, ज्यामुळे मध्य पूर्वेतील सर्वात महत्त्वाच्या तेल मार्गावर संपूर्ण सुरक्षा पुनर्स्थापित होऊ शकते.

बाजारात या वृत्ताची जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र तज्ज्ञांनुसार, आता याचा आनंद साजरा करणं घाई ठरू शकते. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी स्पष्ट केलं की, त्यांनी आपल्या प्रतिनिधींना इराणसह कोणत्याही करारात घाईगडबड न करण्यास सांगितलं आहे. कारण स्ट्रेट ऑफ होर्मुजमधील निर्बंधासह अनेक गुंतागुंतीच्या मुद्द्यांवर दोन्ही पक्षांमधील मतभेद अजूनही कायम आहेत. न्यूज१८ हिंदीने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com