आपण आयुष्यभरात कमावलेल्या पैशांची योग्य गुंतवणूक करावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. हा पैसा योग्य ठिकाणी गुंतवला तर त्याच्यात वाढ होते. त्याचबरोबर अडीअडचणीमध्ये तो उपयोगाला येतो. म्युच्युअल फंड आणि विमा हे गुंतवणूक करण्याचे सर्वात लोकप्रिय प्रकार आहेत. अनेक जण यामध्ये गुंतवणूक करतात, पण ही गुंतवणूक करताना काही गोष्टींची खबरदारी आवश्यक आहे.
इक्विटी बाजारातील त्यातही विशेषत: मिड आणि स्मॉल कॅप क्षेत्रातील गुंतवणूकदार आकर्षक परतावा मिळवण्यासाठी या क्षेत्रात अधिक आकर्षित होतात. गुंतवणुकदारांना मिड आणि स्मॉल कॅप फंडांकडे वळवलं जात असल्याचं चित्र आहे. आणि जेव्हा एखाद्या विशिष्ट क्षेत्रात जास्त गुंतवणुकीमुळे जोखीम वाढते, तिथे अजून एक गोष्ट देखील कार्यरत असते.
विमा पॉलिसींसह इतर अनेक गुंतवणूक म्हणजे म्युच्युअल फंड असल्याचा अनेकांचा समज असतो. नेमकी याच बाबतीमध्ये गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कारण, आपल्या कष्टाचे पैसे गुंतवण्यापूर्वी ते कुठं गुंतवणार याची संपूर्ण माहिती घेतली तर नंतरचा पश्चाताप टळतो.
या दोघांमध्ये नेमका काय फरक आहे जाणून घेऊ.
प्रत्येक स्मॉल कॅप फंड हा म्युच्युअल फंड नसतो.
म्युच्युअल फंड स्मॉल कॅप योजना देत असतात आणि मार्च 2020 पासून स्मॉल कॅप क्षेत्रात आलेल्या तेजीमुळे या फंडांनी चांगली कामगिरी केली आहे. तरीही, स्मॉल कॅप फंड या शब्दाचा अर्थ म्युच्युअल फंड होतो असे नाही.
विमा कंपन्या युनिट लिंक्ड इन्शुरन्स पॉलिसी (ULIP) ऑफर करतात. या पॉलिसींमध्ये विमा आणि गुंतवणुकीचे एकत्रीकरण असते. कारण, यामध्ये प्रीमियमचा काही भाग फंडाला दिला जातो आणि फंडाची कामगिरी पॉलिसीवरील पेआउट ठरवते.
या पॉलिसींमध्ये फंडांची निवड देखील असते ज्यात लार्ज कॅप, मिड कॅप आणि अगदी स्मॉल कॅप फंडांचा देखील समावेश असतो, कारण अशा पर्यायाद्वारे स्मॉल कॅपचे प्रदर्शन होते, मात्र यामुळे गुंतवणूक ही म्युच्युअल फंड बनत नाही. आणि म्हणूनच उत्पादनाची ऑफर करणाऱ्या घटकाला नीट समजून घेणे आवश्यक आहे. यामुळेच गुंतवणुकीचे खरे मूल्य काय आहे याची व्यवस्थित कल्पना येईल.
वितरण समजून घ्या
गुंतवणुकीची सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे गुंतवणूकदाराने खरी गुंतवणूक काय आहे आणि ती कुठे जात आहे हे समजून घ्यायला हवं. स्मॉल कॅप म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक केल्याने तुमचे सर्व पैसे स्मॉल कॅपमध्ये जातील हे निश्चित होतं. जसं की त्या कंपन्यांकडून सांगण्यात आलेलं असतं ज्या कंपन्या देशातील मार्केट कॅपनुसार टॉप 250 च्या वर आहेत. दुसरीकडे, जेव्हा तुम्ही ULIP मध्ये स्मॉल कॅप फंडात गुंतवणूक करता तेव्हा तुम्हाला पॉलिसीची वैशिष्ट्ये पहावी लागतात. याचा अर्थ असा होतो की प्रीमियमची रक्कम मॉर्टालिटी शुल्काकडे जाईल.
याशिवाय, पॉलिसीशी संबंधित इतर अनेक खर्च देखील वजा केले जातील आणि नंतर उर्वरित रक्कम फंडामध्ये गुंतविली जाईल.
योग्य पद्धतीने तुलना करा
गुंतवणुकदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करणारा आणखी एक पैलू म्हणजे स्मॉल कॅपमध्ये जास्त परतावा मिळतो हे दाखवण्यासाठी केलेली तुलना.
उदाहरणादाखल असं समजू की दिलेल्या कालावधीत लार्ज कॅप इंडेक्सची स्मॉल कॅप इंडेक्सशी तुलना करताना, स्मॉल कॅप इंडेक्सचा परतावा पूर्वीपेक्षा जास्त आहे. आणि गेल्या काही वर्षांतील ही सत्य परिस्थिती असेलही, ज्यामध्ये स्मॉल-कॅप क्षेत्राने खरंच चांगली कामगिरी केली आहे.
परंतु ही तुलना योग्य नाही. कारण यामुळे गुंतवणूकदारांना असे वाटू लागते की ही परिस्थिती अशीच कायम राहील. यातला सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे जोखीम. कारण लार्ज कॅप इक्विटी आणि स्मॉल कॅप्समधील जोखमीचे घटक पूर्णपणे वेगवेगळे असतात आणि स्मॉल कॅपमध्ये गुंतवणूक करताना अनेक गुंतवणूकदारांना ते हाताळणे अवघड जाऊ शकते.
बाजाराची कामगिरी पाहण्यासाठी योग्य कालावधी निवडणे देखील महत्त्वाचे आहे, नाहीतर जे चित्र तयार होईल ते पूर्णपणे वेगळे असेल आणि गुंतवणुकीचा निर्णय योग्य घटकांवर आधारित असणार नाही.
फंडाचा परतावा हा तुमचा परतावा असू शकत नाही
म्युच्युअल फंडाच्या अगदी उलट, जेथे फंडांमध्ये गुंतवणूक केल्यास फंडाने मिळवलेले परतावे हे गुंतवणूकदारांचे परतावे असतील याची खात्री असते, मात्र युनिट लिंक्ड योजनांसाठी परिस्थिती बदलते.
अंतिम परिणामाशी निगडीत खर्चासह इतर अनेक घटक यात गुंतलेले आहेत; जरी एखाद्या गुंतवणूकदाराला फंडाचे एक्सपोजर असले तरी, त्यांना दिसणारे अंतिम परिणाम हे पूर्णपणे वेगळे असू शकतात.
याशिवाय, एकाच उत्पादनामध्ये विमा आणि गुंतवणूक यांचे एकत्रीकरण करणे ही चांगली कल्पना नाही, त्यापेक्षा त्यांना वेगळे ठेवणेच चांगले राहील.
गुंतवणूकदाराने कोणताही निर्णय घेतला तरी गुंतवणूक योग्य माहितीवर आधारित आहे आणि आपली दिशाभूल केली जात नाही याची खात्री मात्र प्रत्येक गुंतवणूकदाराने करून घेणे आवश्यक आहे..
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world