EXCLUSIVE: 'आर्थिक विकासाचा बळी नाही, भारत आजही सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था'

भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) गव्हर्नर शक्तिकांत दास (Shaktikanta Das) यांनी NDTV चे एडिटर इन चीफ संजय पुगालिया यांना एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:


भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) गव्हर्नर शक्तिकांत दास (Shaktikanta Das) यांनी NDTV चे एडिटर इन चीफ संजय पुगालिया यांना एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली आहे. दास यांनी या मुलाखतीमध्ये गेल्या काही वर्षांमधील आव्हानांचा उल्लेख केला. आम्ही आर्थिक विकासाचा बळी दिलेला नाही. भारत आजही सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था असल्याचं त्यांनी सांगितलं.  आव्हानं असूनही आपली अर्थव्यवस्था मजबूत झाली आहे. महागाईच्या आघाडीवरही त्यांनी समाधान व्यक्त करत देशात महागाई कमी होत असल्याचं सांगितलं. 

 ( नक्की वाचा : EXCLUSIVE: COVID नंतरच्या आव्हानांचा कसा सामना केला? RBI प्रमुखांची NDTV वर खास मुलाखत )
 

आरबीआय गव्हर्नर यांनी एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये सांगितलं, 'कोव्हिडनंतरच्या वेगवेगळ्या टप्प्यात मोठी आव्हानं होती. जगासमोरही अनेक आव्हानं होती. क्रेन युद्धाचा परिणाम मोठा होता. सरकार आणि RBI नं एकत्र चांगलं काम केलं. 

कोव्हिडचा जागतिक अर्थव्यवस्थेलाही फटका बसला. पण, कोव्हिडसह सर्व आव्हानांमधून आपण बाहेर पडलो. आम्ही याबाबत 100 पेक्षा जास्त उपाय केले आहेत, असं त्यांनी सांगितलं. 

आरबीआय गव्हर्नरांनी कोव्हिड आणि युक्रेन युद्धाचं उदाहरण देत सांगितलं की, 'आपण ज्या पद्धतीनं संकटातून बाहेर पडलो आहोत ते अनुकरणीय आहे. पली अर्थव्यवस्था आणि आर्थिक विकास अत्यंत सशक्त झाली. विकासाची गती मजबूत आहे. चलनवाढ नियंत्रणात आहे. आर्थिक क्षेत्र 5-6 वर्षांच्या तुलनेमध्ये आता अधिक स्थिर आणि लवचिक आहे.

Advertisement

( नक्की वाचा : ITR Refund: तुमचा टॅक्स रिफंड कधी येणार? वाचा कोणत्या ITR फॉर्ममुळे मिळेल जलद रक्कम )
 

महागाईच्या विषयावरही शक्तिकांत दास यांनी या मुलाखतीमध्ये उत्तर दिलं. सध्या देशात महागाई कमी होत आहे. अर्थाच 4 टक्के लक्ष्य अजूनही दूर आहे. आपण किंमतीच्या स्थैर्यावर लक्ष ठेवून आहोत. आर्थिक स्थैर्य कायम ठेवणे खूप आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं. कृषी क्षेत्रामध्ये आऊटपूट वाढलं पाहिजे. बँक आणि एनबीएफसीच्या कारभारवर नजर ही आरबीआयची प्राथमिकता आहे. अर्थव्यवस्थेमध्ये बँकांचं योगदान चांगलं आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं. 

Topics mentioned in this article