जाहिरात

EXCLUSIVE: COVID नंतरच्या आव्हानांचा कसा सामना केला? RBI प्रमुखांची NDTV वर खास मुलाखत

EXCLUSIVE: आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितलं की, आपण युक्रेनसह अनेक संकटांमधून ज्या पद्धतीनं बाहेर पडलो ते अनुकरणीय आहे.'

EXCLUSIVE: COVID नंतरच्या आव्हानांचा कसा सामना केला? RBI प्रमुखांची NDTV वर खास मुलाखत
मुंबई:

एनडीटीव्हीचे एडिटर-इन-चीफ संजय पुगलिया यांच्याशी चर्चा करताना रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) चे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी कोव्हिडनंतर आलेलं संकट आणि त्याचा केलेला सामना या महत्त्वाच्या विषयाचं सविस्तर विश्लेषण केलं. COVID नंतरच्या आव्हानांचा आपण चांगला सामना केला. आपण 100 पेक्षा जास्त उपाय केले. कोव्हिडमुळे जागतिक अर्थव्यवस्थेचं स्थायी नुकसान झालं, असं त्यांनी सांगितलं. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

शक्तिकांत दास म्हणाले की, 'आपण कोव्हिड आणि त्यानंतरच्या आव्हानांचा योग्य पद्धतीनं सामना केला. कोव्हिडनंतर वेगवेगळ्या प्रकारची मोठी आव्हनं होती. जगासमोरही अनेक आव्हानं होती. युक्रेन युद्धाचा परिणाम मोठा होता. सरकार आणि RBI नं एकत्र चांगलं काम केलं. 

त्यांनी सांगितलं की, कोव्हिडमुळे ग्लोबल इकोनॉमीच्या आऊटपूटला फटका बसला. कोव्हिडसह सर्व आव्हानांचा सामना करुन आपण त्यामधून बाहेर पडलो. 

शक्तिकांत दास यांनी सांगितलं की, 'आपली अर्थव्यवस्था आणि आर्थिक विकास अत्यंत सशक्त झाली. विकासाची गती मजबूत आहे. चलनवाढ नियंत्रणात आहे. आर्थिक क्षेत्र 5-6 वर्षांच्या तुलनेमध्ये आता अधिक स्थिर आणि लवचिक आहे. आपण युक्रेनसह अनेक संकटांमधून ज्या पद्धतीनं बाहेर पडलो ते अनुकरणीय आहे.'

2024-25 मध्ये भारत सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था राहील, असा विश्वास त्यांनी या मुलाखतीमध्ये व्यक्त केला.

( नक्की वाचा :  ITR Refund  तुमचा टॅक्स रिफंड कधी येणार? वाचा कोणत्या ITR फॉर्ममुळे मिळते जलद रक्कम )
 

आमचा फोकस RBI ची पॉलिसी सोप्या भाषेत सादर करणे आहे. सामान्य नागरिकांसाठी RBI ही एक रहस्यमयी संस्था आहे. आरबीआयनं 1935 साली काम सुरु केलं. आज UPI पेमेंटमध्येही RBI ची मोठी भूमिका आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Previous Article
ITR Refund: तुमचा टॅक्स रिफंड कधी येणार? वाचा कोणत्या ITR फॉर्ममुळे मिळते जलद रक्कम
EXCLUSIVE: COVID नंतरच्या आव्हानांचा कसा सामना केला? RBI प्रमुखांची NDTV वर खास मुलाखत
exclusive-economic-growth-sacrifice-has-been-minimal-india-will-still-be-fastest-growing-economy-rbi-chief-shaktikanta-das-on-ndtv
Next Article
EXCLUSIVE: 'आर्थिक विकासाचा बळी नाही, भारत आजही सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था'