केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण ( FM Nirmala Sitharaman) यांनी 'एनडीटीव्ही'चे 'एडिटर-इन-चीफ' संजय पुगालिया यांना दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये संसदेत नुकत्याच सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाचं (Budget 2024) खास विश्लेषण केलं आहे. त्यांनी राज्यासाठी निर्धारित केलेलं बजेटपासून ते शेतकरी आणि विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या इंटर्नशिपबद्दल संपूर्ण माहिती दिली आहे. हे बजेट तरुणांसाठी खास पॅकेज आहे, असं अर्थमंत्र्यांनी सांगितलं. या बजेटमधील इंटर्नशिप योजना आहे. त्यामध्ये देशातील टॉप 500 कंपन्यांमध्ये नोकरी दिली जाणार आहे.
निर्मला सीतारमण यांनी एनडीटीव्हीला सांगितलं की, 'सरकार तरुणांना इंडस्ट्री 4.0 साठी तयार करेल. तरुणांना यामध्ये अनेक प्रकारची काम करत येतील.
( नक्की वाचा : तुमच्या Income Tax मध्ये किती बचत होणार? वाचा Budget 2024 मधील सर्व बदल )
त्यांनी सांगितलं की, 'तरुणांचं विश्व डिजिटल असतं, आम्ही त्यांना त्यासाठी तयार करु. त्यांना उद्योगपूरक प्रशिक्षण देऊ. रोबोटिक्स, वर्ल्ड ऑफ वेब आणि एआर सारख्या अत्याधुनिक यंत्रणांसह त्यांना काम करता येईल, यासाठी आम्ही प्रयत्न करु,
अर्थमंत्र्यांनी सांगितलं, 'आम्ही तरुणांना इंटर्नशिप योजनांसाठी तयारकरणार आहोत.त्यांना इंटर्नशिपच्या दरम्यान कुणीही नोकरीतून काढणार नाही, याची आम्ही खबरदारी घेऊ. त्यासाठी आम्ही अनेक कंपन्यांशी बोलणी केली आहे. सर्वांच्या सहमतीनं आम्ही ही योजना आणली आहे.'