![Union Budget 2025 : प्रामाणिक करदात्यांच्या सन्मानासाठी कर सवलतीचा निर्णय - अर्थमंत्री निर्मला सीतारमण Union Budget 2025 : प्रामाणिक करदात्यांच्या सन्मानासाठी कर सवलतीचा निर्णय - अर्थमंत्री निर्मला सीतारमण](https://c.ndtvimg.com/2025-02/cru6r2vo_nirmala_625x300_02_February_25.jpg?im=FeatureCrop,algorithm=dnn,width=773,height=435)
Union Budget 2025 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Finance Minister Nirmala Sitharaman) यांना 1 फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प मांडला. अर्थसंकल्पाना मध्यमवर्गासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आयकराबाबत मोठी घोषणा केला. विकसित भारताच्या दिशेने वाटचाल करताना अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत करण्यावर सरकारने भर दिला आहे. अर्थसंकल्प आणखी सोप्या पद्धतीने समजून घेण्यासाठी एनडीटीव्ही समूहाचे मुख्य संपादक, संजय पुगलिया यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याशी खास बातचित केली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी म्हटलं की, विकासित भारताच्या दिशेने वाटचाल करत असताना पुढील 20-25 वर्षांसाठी भारताचा पाया मजबूत होण्यासाठी आम्ही तयारी करत आहोत. पंतप्रधान यांच्या नेतृत्त्वात आम्ही काम करत असताना सर्वसामान्य नागरिकांवर विशेष लक्ष देण्यावर आमचा भर आहे. मध्यवर्गांसाठी काहीतरी मोठं केले पाहिजे यासाठी आधीपासून सरकारचा विचार होता. यासाठी अभ्यास करा आणि काहीतरी मोठा निर्णय मध्यमवर्गासाठी घ्या, अशा सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम्हाला दिल्या होत्या.
नक्की वाचा - Union Budget 2025: शेतकरी ते AI.. बजेटमधून कुणाला काय मिळालं? वाचा 10 मोठ्या घोषणा
प्रामाणिक करदात्यांकडे आमचं आधीपासूनच लक्ष होते. करदात्यांचा सन्मान करण्याचा विचार पंतप्रधान नरेंद्र मोदी करत होते. यासाठी 12 लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्या नागरिकांना दिलासा देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे. मागील दोन-तीन वर्षांपासून भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे. आयएमएफच्या दृष्टीकोणातून आपण पुढील वर्षीही वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असणार आहोत. यासंदर्भात टॅक्सपेअर्सचा सन्मान राखण्यासाठी आयकर प्रस्ताव आम्ही आणला, असं अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी म्हटलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world