मुदत ठेवीमध्ये (Fixed Deposit) गुंतवणूक सुरक्षित मानली जाते आणि परतावा देखील निश्चित असते. त्यामुळे अनेकांना त्यात गुंतवणूक करायला आवडते. परंतु जर तुम्हाला मुदत ठेवीवर अधिक परतावा मिळवायचा असेल तर यासाठीही एक मार्ग आहे. अनेकदा लोक कर वाचवण्यासाठी पत्नीच्या नावावर एफडी करून घेतात. जर तुम्हाला एफडीवर जास्तीत जास्त परतावा मिळवायचा असेल तर तुमच्या पत्नीऐवजी तुमच्या आईच्या नावावर मुदत ठेव ठेवणे हा एक चांगला मार्ग ठरू शकतो. तुमच्या आईच्या नावावर FD करून तुम्हाला जास्त व्याज आणि इतर अनेक फायदे मिळू शकतात.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
जास्त व्याज मिळवा
पत्नीच्या नावावर एफडी करून तुम्ही निश्चितपणे कर वाचवू शकता. परंतु तुम्हाला त्यावर तेवढेच व्याज मिळेल जेवळे तुमच्या नावावर एफडी केल्यावर मिळेल. जर तुम्ही तुमच्या आईच्या नावावर FD केली तर तुम्हाला त्यावर जास्त व्याज मिळू शकते. तुमच्या आईचे वय 60 वर्षे किंवा त्याहून अधिक असेल, म्हणजेच त्या ज्येष्ठ नागरिक असतील तरच एफडी करून तुम्हाला 0.50 टक्के जास्त परतावा मिळू शकतो.
जर तुमच्या आईचे वय 80 किंवा त्यापेक्षा जास्त असेल म्हणजेच सुपर सीनियर सिटिझन म्हणून 0.75 ते 0.80 टक्के जास्त व्याज मिळू शकते. जास्त परताव्यासाठी तुम्ही तुमच्या आई किंवा वडिलांच्या नावावर एफडी करू शकता. वास्तविक, ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर जास्त परतावा मिळतो.
(नक्की वाचा - Larsen And Toubro : घरी बसून बायकोला किती वेळ बघत बसणार ? 90 तास काम करा! L&T चेअरमन यांचा सल्ला)
TDS च्या लिमितमध्ये सूट
FD मधून मिळणाऱ्या उत्पन्नावर TDS (Tax Deducted at Source) कापला जातो. जर एखाद्या आर्थिक वर्षात FD वरून मिळणारे व्याज 40,000 रुपयांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला 10 टक्के TDS भरावा लागतो. मात्र ज्येष्ठ नागरिकांसाठी ही मर्यादा 50,000 रुपये आहे.
(नक्की वाचा- Anand Mahindra : 'मला माझ्या पत्नीला न्याहाळायला आवडतं'; 70 तासांच्या कामावरील आनंद महिंद्रांच्या विधानानं जिंकली मनं!)
टॅक्स लायबिलिटी देखील कमी करू शकता
तुम्ही तुमच्या नावावर FD मध्ये गुंतवणूक केली तर त्यातून मिळणारे उत्पन्न तुमच्या उत्पन्नात जोडले जाते. म्हणजे अशा परिस्थितीत तुम्हाला जास्त कर भरावा लागू शकतो. म्हणूनच, जर तुम्ही तुमच्या आईच्या नावावर एफडी केली तर तुम्ही अशा प्रकारे तुमचा करही वाचवू शकता.
जर तुमची आई ज्येष्ठ नागरिक असेल आणि तिचे इतर कोणतेही उत्पन्न नसेल किंवा कमी कराच्या कक्षेत येत असेल तर तुम्ही तिच्या नावावर एफडी करून हे सर्व फायदे मिळवू शकता. बहुतेक कुटुंबांमध्ये, स्त्रिया एकतर कमी कराच्या कक्षेत येतात किंवा घर बनवणाऱ्या असतात. त्यामुळे त्यांच्यावर कोणताही कर दायित्व नाही.