Gautam Adani Succession Plan: अदाणी ग्रुपमध्ये गौतम अदाणींनंतर कोण? रोडमॅप निश्चित

Gautam Adani Succession Plan अदाणी ग्रुपच्या जवळपास 213 बिलियन डॉलर साम्राज्याचे संचालक गौतम अदाणी (Gautam Adani)  यांच्यानंतर कोण? याबाबत उद्योगजगतात नेहमी चर्चा सुरु असते

जाहिरात
Read Time: 2 mins
गौतम अदाणी : अदाणी ग्रुपचे संचालक
मुंबई:

Gautam Adani Succession Plan अदाणी ग्रुपच्या जवळपास 213 बिलियन डॉलर साम्राज्याचे संचालक गौतम अदाणी (Gautam Adani)  यांच्यानंतर कोण? याबाबत उद्योगजगतात नेहमी चर्चा सुरु असते. गेल्या काही वर्षात याचं चित्र हळूहळू स्पष्ट होत आहे. इतरांसाठी हे कदाचित नवीन असेल, पण गौतम अदाणी यांनी एक दशकापूर्वीच याबाबत बराच विचार करुन ठेवला आहे. 

अदाणी ग्रुपचे संचालक गौतम अदाणी यांनी नुकतीच त्याच्या उद्योग साम्राज्याच्या उत्तराधिकारीबाबतची रणनिती जाहीर केली. आपण 70 व्या वर्षी निवृत्त होण्याची योजना तयार करत आहोत, असं त्यांनी ब्लूमबर्गला सांगितलं. त्यामुळे पुढच्या पिढीला नेतृत्त्वाचा एक टप्पा तयार होईल.

मुलं आणि पुतण्यांच्या खांद्यावर जबाबदारी

ब्लूमबर्गला दिलेल्या मुलाखतीमध्ये गौतम अदाणी यांनी लॉन्‍ग-टर्म बिजनेस सस्‍टेनेबिलिटी (व्‍यावसायिक स्थिरता) साठी उत्तराधिकारीबाबतच्या योजनेची चर्चा केली. त्यांनी याबाबतची तयारी एक दशकापूर्वीच सुरु झाल्याचं सांगितलं. अदाणी ग्रुपचं भविष्य त्यांची दोन्ही मुलं करण आणि जीत अदाणी यांच्यासह पुतणे प्रणव आणि सागर अदाणी यांच्या हातामध्ये असेल. फॅमिली ट्रस्टमध्ये सर्वांना समान वाटा असेल. 

'उत्तराधिकारीबाबतची माझी योजना ही जवळपास एक दशकांपूर्वीच सुरु झाली. मी हळू-हळू आमचे 'G2', प्रणव, करण, सागर आणि आता जीतला सहभागी केलं आहे,' असं त्यांनी या मुलाखतीमध्ये स्पष्ट केलं.

दुसरी पिढी पहिल्यापासूनच सक्रीय

  • अदाणी पोर्ट आणि स्पेशल इकोनॉमी झोन (APSEZ) चे MD करण अदाणी लॉजिस्टिक्स आणि पोर्ट संचालनाची देखरेख करत आहेत. 
  • त्यांचे लहान चिरंजीव जीत अदाणी, ग्रुपमधील डिजिटल उपक्रम आणि भारतामधील सर्वात मोठ्या खासगी विमानतळ नेटवर्कच्या व्यवस्थापनाचे काम करत आहेत.
  • गौतम अदाणी यांचे पुतणे प्रणव अदाणी या ग्रुपच्या कृषी आणि ऑईल सेक्टरचं नेतृत्त्व करतात.
  • त्यांचे दुसरे पुतणे सागर अदाणी हे एनर्जी बिझनेस आणि  रीन्यूएबल एनर्जी प्रोजेक्ट्स सांभाळत आहेत. 

दुसऱ्या पिढीवर पूर्ण विश्वास

वाढीसाठीचा उत्साह आणि एकत्र काम करण्याची तत्परता पाहून गौतम अदामी यांनी स्वत:च्या उत्तराधिकाऱ्यांवर (Successors) विश्वास व्यक्त केला. त्यांनी सांगितलं की, 'मला विश्वास आहे की त्यांच्यात विस्ताराची भूक आहे. जी दुसऱ्या पिढीमध्ये (Second Generation) कमी पाहायला मिळते. 

Advertisement

त्यांनी अदाणी समुहाच्या परंपरेची निरंतरता आणि यश सुनिश्चित करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांवर भर दिला. 

अहमदाबादमधील अदाणी ग्रुपच्या मुख्यालयात गौतम अदाणी यांनी ब्लूमबर्गला सांगितलं, 'उत्तराधिकार, व्यवसायाच्या स्थिरतेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे.' त्यांनी सांगितलं की, 'मी पुढच्या पिढीवर ही चॉईस सोडलीय. कारण, हा  संपूर्ण बदल हळूवार आणि पद्धतशीरपणे होणे आवश्यक आहे.

Topics mentioned in this article