Gold Rate: सोन्याचे दर लवकरच 1 लाखांच्या खाली येणार? काय आहे कारण?

Gold Rate: सोन्याच्या किमतीत ऐतिहासिक उच्चांकावरून 24,500 रुपयांची मोठी घसरण झाली आहे. रशियाने पुन्हा अमेरिकन डॉलरमध्ये व्यापार सुरू करण्याच्या हालचाली केल्यामुळे सोन्याची मागणी घटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

गेल्या वर्षभरात सोन्याच्या दराने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. मात्र 2026 च्या सुरुवातीलाच सोन्याच्या बाजारात मोठी पडझड पाहायला मिळत आहे. मल्टि कमोडिटी एक्स्चेंजवर (MCX) सोन्याने 1,80,779 रुपये प्रति 10 ग्रॅमचा ऐतिहासिक टप्पा ओलांडल्यानंतर आता त्यात मोठी घसरण सुरू झाली आहे.

सोमवारी (16 फेब्रुवारी) देखील सोन्याचा भाव 1,54,937 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत होता. त्यानंतर सोन्याच्या किमतीत ऐतिहासिक उच्चांकावरून 24,500 रुपयांची मोठी घसरण झाली आहे. बाजार तज्ज्ञांच्या मते, रशियाने पुन्हा अमेरिकन डॉलरमध्ये व्यापार सुरू करण्याच्या हालचाली केल्यामुळे सोन्याची मागणी घटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

(नक्की वाचा-  Crime News: बदलापुरात खळबळ! चित्रकला स्पर्धेचं आमीष दाखवून पालकांसह मुलांना बोलावलं अन्...)

रशियाचा 'यू-टर्न' आणि डॉलरचा प्रभाव

रशिया पुन्हा एकदा अमेरिकेसोबत डॉलरमध्ये (USD) व्यापार सुरू करण्याची शक्यता पडताळून पाहत असल्याचे वृत्त 'लाईव्हमिंट'ने दिले आहे. रशिया आतापर्यंत 'डी-डॉलरायझेशन' (de-dollarisation) म्हणजेच डॉलरचा वापर कमी करण्याच्या मोहिमेचे नेतृत्व करत होता.

जर रशिया पुन्हा डॉलर सिस्टमकडे वळला, तर मध्यवर्ती बँकांकडून होणारी सोन्याची मागणी घटू शकते. भारत, रशिया, चीन आणि ब्राझील यांसारख्या देशांनी डॉलरवर अवलंबून राहणे कमी करण्यासाठी गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर सोन्याची खरेदी केली होती. मात्र, रशियाच्या या निर्णयामुळे या धोरणाला मोठा धक्का बसू शकतो.

Advertisement

(नक्की वाचा-  Ajit Pawar News: घात की अपघात? अजित पवारांच्या विमान अपघाताचं गुढ उलगडणार? सरकारचा मोठा निर्णय)

सोन्याचा भाव 1 लाखाच्या खाली येणार?

तज्ज्ञांच्या मते भारतात सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 1 लाख रुपयांच्या खाली येऊ शकतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोने 3000 डॉलर प्रति औंसपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे. बाजारात येणारी छोटी सुधारणा ही केवळ 'डेड कॅट बाऊन्स' (तात्पुरती सुधारणा) असू शकते, त्यानंतर पुन्हा मोठी घसरण होऊ शकते.

रिक्स देशांची सोन्यावर पकड

जगातील एकूण सोने उत्पादनापैकी 50 टक्के उत्पादन ब्रिक्स देशांच्या ताब्यात आहे. 2020 ते 2024 दरम्यान जागतिक सोन्याच्या खरेदीत या देशांच्या मध्यवर्ती बँकांचा वाटा 50 टक्के होता. मात्र, रशियाने डॉलरचा स्वीकार केल्यास सोन्याच्या साठवणुकीपेक्षा चलनातील व्यवहारांना महत्त्व प्राप्त होईल, ज्यामुळे सोन्याचे भाव कोसळतील.
 

Advertisement
Topics mentioned in this article