Gold-Silver Rate Today : मागील काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत मोठी घसरण पाहायला मिळत आहे. विशेषतः, इराण आणि इस्रायलमधील युद्धबंदीनंतर, गुंतवणूकदारांचं सोन्याच्या सुरक्षित गुंतवणुकीकडे असलेलं आकर्षण कमी झाल्याचे दिसून येत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याच्या दरात घसरण झालेली पाहायला मिळत आहे.
मागील दोन आठवड्यात सोन्याच्या दरात 4100 रुपयांचा घसरण झाली आहे. नागपूर सराफा बाजारात सोन्याच्या दरात आजही घसरण पाहायला मिळत आहे. आज 30 जून रोजी सोन्याचे दर प्रतितोळा 95600 रुपये आहेत. तर चांदीच्या दरातही घसरण झालेला पाहायला मिळत आहे. चांदीचा भाव प्रतिकिलो 1 लाख 6 हजार 500 रुपयांवर आला आहे.
(नक्की वाचा- NPS vs Mutual Fund SIP: सेवानिवृत्ती नियोजनेसाठी काय चांगले? अधिक परतावा कुठे मिळेल?)
18 जून रोजी सोन्याचे दर प्रतितोळे 99 हजार 700 रुपये होते. जे आज 30 जून रोजी 95600 रुपये आहेत. अशारितीने सोन्याच्या दरात आज दोन आठवड्याच्या तुलनेत 4100 रुपयांचा घसरण झाली आहे. चांदीच्या दरातही 3200 रुपयांची घसरण पाहायला मिळत आहे.
सोन्याच्या शुद्धतेनुसार दर (30 जून)
- 24 कॅरेट - 94,600 रुपये प्रतितोळे
- 22 कॅरेट - 86,900 रुपये प्रतितोळे
- 18 कॅरेट- 72,600 रुपये प्रतितोळे
- 14 कॅरेट- 60,100 रुपये प्रतितोळे
(नक्की वाचा- Investment News: बाजाराने दिलेत सुपर तेजीचे संकेत, आत्ता गुंतवणूक करावी का?)
सोन्याची किंमत कशी ठरवली जाते?
आंतरराष्ट्रीय बाजारातील किमती, सरकारचे कर आणि रुपयाच्या मूल्यातील चढ-उतार अशा अनेक कारणांमुळे भारतात सोन्याच्या किमतीत बदल होतो. सोने हे केवळ गुंतवणुकीचे साधन नाही त्यासोबत भारतीयांचा भावनिक नातं आहे. लग्न आणि सणांमध्ये सोन्याची मागणीत मोठी वाढ होता.