जाहिरात

NPS vs Mutual Fund SIP: सेवानिवृत्ती नियोजनेसाठी काय चांगले? अधिक परतावा कुठे मिळेल?

आम्ही तुम्हाला एसआयपी आणि एनपीएस या दोन्हीची खास वैशिष्ट्ये सोप्या भाषेत समजावून सांगणार आहोत.

NPS vs Mutual Fund SIP: सेवानिवृत्ती नियोजनेसाठी काय चांगले? अधिक परतावा कुठे मिळेल?
मुंबई:

आजकाल लोक त्यांच्या सेवानिवृत्ती नियोजनाबद्दल (Retirement Planning) आधीपासूनच विचार करू लागले आहेत. यासाठी कोणी म्युच्युअल फंड एसआयपी (Mutual Fund SIP) करतो तर कोणी एनपीएसला (नॅशनल पेन्शन सिस्टम) चांगले मानतो. पण प्रश्न असा आहे की, दीर्घकाळात जास्त परतावा कुठे मिळेल? आणि कोणता पर्याय अधिक सोयीस्कर आणि फायदेशीर आहे? तुम्हीही याच गोंधळात असाल तर, आम्ही तुम्हाला एसआयपी आणि एनपीएस या दोन्हीची खास वैशिष्ट्ये सोप्या भाषेत समजावून सांगणार आहोत. जेणेकरून तुमच्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम आहे, हे तुम्ही स्वतः ठरवू शकाल.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

SIP चे फायदे काय? 
म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये गुंतवणूकदार स्वतः ठरवू शकतो की पैसे इक्विटी फंडात गुंतवायचे की डेटमध्ये. जर तुम्ही दीर्घकाळासाठी इक्विटी फंड निवडलात तर वार्षिक 10-15% पर्यंत परतावा मिळू शकतो. तर एनपीएसमध्ये इक्विटीचा हिस्सा मर्यादित असतो. म्हणजेच टियर-1 मध्ये कमाल 75% असतो. म्हणून, एनपीएसमधून मिळणारा परतावा साधारणपणे 8-10% च्या दरम्यान असतो. एसआयपीमध्ये परताव्याची व्याप्ती जास्त आहे. पण धोकाही थोडा जास्त असतो.

ट्रेंडिंग बातमी - Uddhav Thackeray: राज ठाकरेंबरोबर युती होणार? उद्धव ठाकरेंचं सुचक वक्तव्य काय?

कर वाचवण्यासाठी NPS अधिक फायदेशीर
जर तुमचा उद्देश कर वाचवणे असेल तर एनपीएस हा एक चांगला पर्याय आहे. यामध्ये तुम्ही 80C अंतर्गत ₹1.5 लाख पर्यंत आणि 80CCD(1B) अंतर्गत अतिरिक्त ₹50,000 पर्यंत सूट मिळवू शकता. म्हणजेच, एकूण ₹2 लाख पर्यंतची कर बचत तुम्हाला करता येते. तर एसआयपीमध्ये कराचा फायदा फक्त ELSS फंडात मिळतो आणि त्यातही फक्त 80C अंतर्गत ₹1.5 लाख पर्यंतच सूट आहे. एसआयपीमध्ये तुम्ही जेव्हा हवे तेव्हा गुंतवणूक थांबवू शकता. पैसे काढू शकता किंवा गुंतवणुकीची रक्कम कमी-जास्त करू शकता. म्हणजेच, तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य आहे. पण एनपीएसमध्ये पैसे काढण्याचे कडक नियम आहेत. पूर्ण पैसे तुम्ही फक्त सेवानिवृत्तीच्या वेळीच काढू शकता. तेव्हाही तुम्हाला 60% रक्कम एकरकमी मिळेल. बाकीच्या 40% मधून पेन्शन मिळते. 

ट्रेंडिंग बातमी - Love Story : होणाऱ्या सुनेसोबत पळून जाऊन सासऱ्यानं केलं लग्न, रात्रीच्या Video कॉलमध्ये आले जवळ

कोणती योजना सुरक्षित ?
एनपीएस ही सरकारच्या देखरेखीखाली चालणारी योजना आहे. तिचा निधी शेअर बाजाराबरोबरच सरकारी रोखे आणि डेट इन्स्ट्रुमेंटमध्येही गुंतवला जातो. त्यामुळे यात चढ-उतार कमी असतात. एसआयपीमध्ये तुम्ही इक्विटी फंड निवडल्यास धोका जास्त असतो, पण परतावा देखील त्यानुसार चांगला असू शकतो.

कोणासाठी काय चांगले ?
जर तुम्ही नोकरदार असाल, कर वाचवू इच्छित असाल आणि सेवानिवृत्तीसाठी एक सुरक्षित आणि निश्चित योजना शोधत असाल तर एनपीएस तुमच्यासाठी चांगले राहील. जर तुम्हाला जास्त परतावा हवा असेल तर थोडा धोका पत्करावा लागेल. त्यानुसार  एसआयपी तुमच्यासाठी एक चांगला पर्याय आहे.

ट्रेंडिंग बातमी - Live Update : संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी कुठपर्यंत पोहोचली?

मग काय करावे? SIP की NPS?
दोन्हीचे स्वतःचे महत्त्व आहे. तुम्ही एनपीएसला तुमच्या सेवानिवृत्तीच्या सुरक्षिततेचा आधार बनवू शकता.  त्याचबरोबर एसआयपीद्वारे वेगवेगळ्या ध्येयांसाठी पैसे जमा करू शकता. यामुळे तुम्हाला कर बचत, परतावा आणि तरलता (liquidity) या तिघांचाही फायदा मिळेल. जर तुम्ही सेवानिवृत्ती नियोजनाचा विचार करत असाल तर तुमच्या गरजेनुसार योग्य निर्णय घ्या.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com