मंगेश जोशी, जळगाव
Gold Rate Today : अमेरिक-चीन यांच्यात सुरु असलेल्या टॅरिफ वॉरमुळे सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सोन्याचे दर लाखांच्या जवळ पोहोचले आहेत. सोन्याच्या दराने आजवरचे सर्व विक्रम मोडीत काढत 98 हजार रुपये प्रति तोळ्याच्या पार गेले आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सोन्याचे भाव हे विक्रमी 98 हजार 200 रुपयांवर पोहोचले आहे. गेल्या दोन दिवसात सोन्याच्या भावात मोठी वाढ झाली आहे. जळगाव सुवर्णनगरीमध्ये जीएसटीविना आज सोन्याचे भाव 95 हजार 400 रुपये तर जीएसटी सह सोन्याचे भाव 98 हजार 200 रुपयांवर पोहोचले आहे.
( नक्की वाचा : US Tariff : टॅरीफ वॉरमुळे माकडे महाग, अमेरिकेचा जालीम 'डोस' भारी पडणार )
जागतिक स्तरावर वाढती अनिश्चितता सोन्याच्या किमतीत वाढ होण्याचे प्रमुख कारण आहे. अमेरिका आणि चीनमधील सुरू असलेल्या टॅरिफ वॉरमुळे गुंतवणूकदार घाबरले आहेत. ट्रम्प प्रशासनाने चीनमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर 245 टक्क्यांपर्यंत शुल्क वाढवले आहे.
याशिवाय, अमेरिकन डॉलर देखील सतत कमकुवत होत आहे. ज्यामुळे सोन्याच्या किमतींना आणखी आधार मिळत आहे. डॉलर निर्देशांक तीन वर्षांच्या नीचांकी पातळीवर आहे, ज्यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची मागणी आणखी वाढत आहे.
( नक्की वाचा : Donald Trump : आयत करावरील स्थगितीनंतर ट्रम्प यांचा आणखी एक U Turn, 'या' गोष्टींना मोठा दिलासा )
कोटक सिक्युरिटीजचे कमोडिटी रिसर्च अॅनालिस्ट कैनत चैनवाला यांच्या मते, जोपर्यंत ट्रेड वॉरमद्ये ठोस तोडगा निघत नाही किंवा तणाव कमी होत नाही तोपर्यंत सोने उच्च पातळीवर राहू शकते. त्याच वेळी, जागतिक गुंतवणूक बँक गोल्डमन सॅक्सचा अंदाज आहे की वर्षाच्या अखेरीस सोन्याची किंमत प्रति औंस 3,700 डॉरलपर्यंत पोहोचू शकतात. याचा अर्थ गुंतवणूकदारांसाठी अजूनही वाढीला वाव आहे. सोन्याच्या भावात मोठी वाढ होत असल्याने ग्राहकही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत.