Gold Rates : 'अब की बार 1 लाख पार', सोन्याचा भाव नव्या उच्चांकावर; पाहा आजचे दर

Gold Rates : सध्या चीन आणि अमेरिकेतील व्यापार युद्ध सुरू आहे. यातून जागतिक अर्थव्यवस्थेतील अस्थिरतेचा परिणाम आपल्याला जाणवू लागला आहे. ज्यामुळे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीच्या शोधात सोन्याकडे वळत आहेत

जाहिरात
Read Time: 2 mins

Gold Rates : लग्नसराईत सोनं खरेदी करणारे आणि तसेच गुंतवणूक म्हणूनही सोन्याची खरेदी करणाऱ्यांचं टेन्शन वाढवणारी बातमी आहे. मागील काही दिवसांत सतत वाढणाऱ्या सोन्याच्या दराने 1 लाखांचा टप्पा पार केला आहे.  त्यामुळे सोनं करणाऱ्यांचा खिसा आता आणखी रिकामा होणार आहे. सोन्याचे दर आज 1,01,400 रुपये प्रतितोळ्यावर पोहोचले आहेत. 

सध्या चीन आणि अमेरिकेतील व्यापार युद्ध सुरू आहे. यातून जागतिक अर्थव्यवस्थेतील अस्थिरतेचा परिणाम आपल्याला जाणवू लागला आहे. अर्थव्यवस्थेत मंदी येण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. ज्यामुळे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीच्या शोधात सोन्याकडे वळत आहेत. अधिक परतावा हवा असेल तर सोनं खरेदी करा असा सल्लाही गुंतवणूक तज्ज्ञांनी यापूर्वीच दिला आहे. त्यामुळे मागणी वाढल्याने सोन्याच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळत आहे. 

सोन्यात गुंतवणुकीचे प्रकार

एक्सचेंज-ट्रेडेड फंड(ETF) : ETF हा सोन्यात गुंतवणुकीचा सर्वात सुरक्षित मार्ग आहे. कारण गुंतवणूकदारांना प्रत्यक्ष सोने साठवून ठेवण्याची अडचण यात नसते.  खरेदी केलेले सोने डीमॅट (पेपर) स्वरूपात साठवले जाते. अशा प्रकारे ते किफायतशीर आणि लहान गुंतवणूकदारांसाठी चांगला पर्याय आहे.

सॉवरेन गोल्ड बॉण्ड्स (SGBs) : एसजीबी हे सरकारकडून जारी केलेले बॉण्ड्स आहेत जे सोन्यात गुंतवणूक करण्याची संधी देतात. जेव्हा तुम्ही हे बॉण्ड्स खरेदी करता तेव्हा सरकार तुम्हाला 2.5 टक्के व्याज देते. बाँडची मुदत संपल्यानंतर, तुम्हाला तुमची सुरुवातीची गुंतवणूक परत मिळते आणि सोन्याच्या किमतीत वाढ होते.

Advertisement

गोल्ड म्युच्युअल फंड: गोल्ड म्युच्युअल हे नियमित फंडासारखे असतात. परंतु स्टॉक किंवा बाँडमध्ये गुंतवणूक करण्याऐवजी ते सोन्याशी संबंधित वेगवेगळ्या मालमत्तांमध्ये गुंतवणूक करतात.

गुंतवणूक सल्लागार, महेश चव्हाण यांनी कमी पैशात सोन्यात गुंतवणूक कशी करावी याबाबत माहिती दिली. "डिजिडल गोल्डमध्ये गुंतवणूकदारांना 100 रुपयांपासून गुंतवणूक करता येणार आहे. तिथे गुंतवणूकदारांनी काळजी घेतली पाहिजे की ज्या प्लटफॉर्मवरुन गुंतवणूक करणार आहात, ती तपासून घेतली पाहिजे. रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवर अधिकृत डिजिटल गोल्ड गुंतवणुकीच्या प्लॅटफॉर्मची माहिती सहज उपलब्ध होऊ शकते", असं महेश चव्हाण यांनी सांगितलं.

Advertisement

VIDEO : सोन्याचे दर शिखरावर जात असताना कशी कराल गुंतवणूक?

Topics mentioned in this article