Gold Silver Price: सोनं पुन्हा चमकलं! आजचा भाव किती? जाणून घ्या सविस्तर

Gold Rate Today 2 july 2025: आज 2 जुलै रोजी सोन्याचे दर पुन्हा एकदा बदल्ल्याचे पाहायला मिळाले असून चांदीच्या दरामध्येही मोठे बदल झाले आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

Gold Silver Rate Today: गेल्या काही दिवसांपासून सराफ बाजारात सोन्याचे भाव चांगलेच कडाडल्याचे दिसत आहे. सोन्याचे दर दिवसेंदिवस वाढत असल्याने ग्राहकांच्या खिशाला चांगलीच कात्री बसत आहे. अशातच भारतीय बाजारात आज 2 जुलै रोजी सोन्याचे दर पुन्हा एकदा बदलल्याचे पाहायला मिळाले असून चांदीच्या दरामध्येही मोठे बदल झाले आहेत. काय आहेत आजचे सोने-चांदीचे दर? जाणून घ्या सविस्तर...

(नक्की वाचा- NPS vs Mutual Fund SIP: सेवानिवृत्ती नियोजनेसाठी काय चांगले? अधिक परतावा कुठे मिळेल?)

आजचा सोन्या- चांदीचा भाव:

नागपूरमधील सराफ पेठेतील दरांनुसार,  24 कॅरेट शुद्ध सोन्याचा दर 10 ग्रॅम प्रतिग्रॅम 96 हजार,500 इतका आहे. त्याचबरोबर 22 कॅरेट सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 90 हजार,700, 18 कॅरेट सोन्याचा दर 76,100 आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 63 हजार, 400 इतका आहे. त्याचबरोबर चांदीचा दर 1,06, 600 इतका असून प्लॅटिनमचा दर 44 हजार इतका आहे. 

दुसरीकडे देशातील विविध शहरांमध्ये सोने- चांदीच्या दरात वाढ पाहायला मिळत आहे. दिल्लीत 22 कॅरेट सोने 90,360 रुपये आणि 24 कॅरेट सोने 98,560 रुपये प्रति 10 ग्रॅम होते. मुंबईतही 22 कॅरेट सोने 90,210 रुपये आणि 24 कॅरेट सोने 98,410 रुपये प्रति 10 ग्रॅम इतके आहे. पटना, लखनऊ, जयपूर सारख्या मोठ्या शहरांमध्ये सोन्याची किंमत याच दराभोवती राहते.

(नक्की वाचा- Investment News: बाजाराने दिलेत सुपर तेजीचे संकेत, आत्ता गुंतवणूक करावी का?)

Topics mentioned in this article