Gold-Silver Rate: सोने 1.56 लाख रुपये तर चांदी 2,46 लाखांवर! मुंबई-दिल्लीसह तुमच्या शहरातील दर तपासा

Gold Silver Rate, 16th February: सोन्या-चांदीचे आजच दर काय आहेत, तुमच्या शहरामध्ये सोने-चांदी महागले आहे का? वाचा सविस्तर माहिती.

जाहिरात
Read Time: 2 mins
"Gold Silver Rate, 16th February: सोन्याचांदीचे आजचे दर"
Canva

Gold Silver Rate, 16th February: जागतिक बाजारातील घडामोडी आणि अमेरिकन अर्थव्यवस्थेतील बदलांचा परिणाम भारतीय सराफा बाजारावर दिसून येत आहे. बुलियन्स वेबसाइटनुसार, आज (16 फेब्रुवारी) भारतात सोन्याचे दर 1,56,520 प्रति 10 ग्रॅम आहेत, तर चांदीचा दर 2,46,060 प्रति 1 किलोवर पोहोचला आहे. गुंतवणूकदारांचे सध्या अमेरिकेतील महागाई, जीडीपी रीडिंग्स आणि फेडरल रिझर्व्हच्या धोरणांकडे लक्ष लागले आहे. याव्यतिरिक्त मध्यवर्ती बँकांची खरेदी आणि डॉलर इंडेक्समधील बदल यामुळे किमतीवर परिणाम होत आहे. दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारात सोने $5,000 प्रति औंसच्या वर गेल्यामुळे व्यापाऱ्यांनी नफा वसुली केली, परिणामी दरात काहीशी घसरणही पाहायला मिळाली.

शहरांनुसार सोन्याचे दर (प्रति 10 ग्रॅम) | Gold Rate 16th February 2026

मुंबईत सोन्याचा दर 1,56,240 रुपये आहे, तर दिल्लीत 1,55,970 रुपये इतका दर आहे. कोलकातामध्ये हा भाव 1,56,030 रुपये इतका नोंदवला गेला आहे. दक्षिण भारतात चेन्नईमध्ये सर्वाधिक 1,56,690 रुपयेतर हैदराबादमध्ये 1,56,490 रुपये आणि बंगळुरूमध्ये 1,56,360 रुपये असे दर आहेत.

शहरांनुसार चांदीचे दर (प्रति 1 किलो) | Silver Rate 16th February 2026

मुंबईत चांदीचा दर 2,45,610 रुपये असून दिल्लीत दर 2,45,190 रुपये आहे. चेन्नईमध्ये चांदीचा भाव 2,46,320 रुपये हैदराबादमध्ये 2,46,000 रुपये आणि बंगळुरूमध्ये 2,45,800 रुपये आहे. कोलकाता येथे चांदीचा दर 2,45,280 इतका आहे.

शहरानुसार सोन्याचे दर (10 ग्रॅम सोने)

  • मुंबई: 1,56,240 रुपये
  • दिल्ली: 1,55,970 रुपये
  • बंगळुरू: 1,56,360 रुपये
  • चेन्नई: 1,56,690 रुपये
  • हैदराबाद: 1,56,490 रुपये
  • कोलकाता:1,56,030 रुपये

शहरानुसार चांदीचे दर ( 1 किलो चांदी)

  • मुंबई: 2,45,610 रुपये
  • दिल्ली: 2,45,190 रुपये
  • बंगळुरू: 2,45,800 रुपये
  • चेन्नई: 2,46,320 रुपये
  • हैदराबाद: 2,46,000 रुपये
  • कोलकाता: 2,45,280 रुपये

शनिवारचे (14 फेब्रुवारी) सोन्याचे-चांदी दर (नागपूर सराफा)
सोन्याचा विक्री दर 

  • 1,56,900 रुपये :स्टँडर्ड (99.5)
  • 1,45,900 रुपये : 22K (916) 
  • 1,20,800 रुपये : 18K (750) 
  • 94,900 रुपये : 14K (583) 
  • 62,800 रुपये : 9K (375)

सोन्याचा खरेदी दर (Gold Purchase Rate)

  • 1,52,200 रुपये : Standard (99.5)
  • 1,41,500 रुपये : 22K (916)  
  • 1,17,200 रुपये : 18K (750) 
  • 91,100 रुपये : 14K (583)
  • 59,700 रुपये: 9K (375)

चांदीचा विक्री दर (Silver Sale Rate)

2,48,400 रुपये :बुलियन, भांडी आणि नाणी/बार  (Bullion and Pure Utensils and Coin/Bar)
2,45,900 रुपये : दागिने

चांदीचे खरेदी दर (Silver Purchase Rate)

2,40,900 रुपये : बुलियन, भांडी आणि नाणी/बार (Bullion and Pure Utensils and Coin/Bar)
2,38,500 रुपये : दागिने