सोने-चांदीच्या दरात घसरण, अक्षय्यतृतीयेच्या तोंडावर नागरिकांसाठी खूशखबर

आतंरराष्ट्रीय बाजारात सोमवारी सोन्याच्या किंमतीत घसरण पाहायला मिळाली. सोन्याच्या किमतीत 0.5 टक्के घसरण झाली. त्यानंतर सोने घसरुन 2327.09 प्रति डॉलर औंसवर आलं आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

सोने-चांदीच्या किंमती गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. सोन्यांची किंमत तर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली आहेत. मात्र अक्षय्यतृतीयेच्या तोंडावर नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. कारण सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण झाली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

अक्षय्यतृतीयेच्या दिवशी सोनं खरेदी शुभ मानली जाते. त्यामुळे अनेकजण अक्षय्यतृतीयेच्या दिवशी सोने खरेदीच्या विचारात असतील. त्या सर्वांसाठी खूशखबर आहे. सोने-चांदी खरेदीदारांनासाठी दिलासादायक माहिती समोर आली आहे. 

आतंरराष्ट्रीय बाजारात सोमवारी सोन्याच्या किंमतीत घसरण पाहायला मिळाली. सोन्याच्या किमतीत 0.5 टक्के घसरण झाली. त्यानंतर सोने घसरुन 2327.09 प्रति डॉलर औंसवर आलं आहे. 

(नक्की वाचा- महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरण: अभिनेता साहिल खानला अटक, 40 तास पोलीस करत होते पाठलाग)

भारतातही सोने-चांदीची किंमत ऑल टाईम हायवरुन घसरुन खाली आली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर 5 जून रोजी मॅच्युअर होणाऱ्या सोन्याची किंमत 276 रुपयांनी घसरून 71,224 प्रति 10 ग्रॅमवर ट्रेड करत आहे. याशिवाय चांदीही 47 रुपयांच्या घसरणीसह मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर 82,449 रुपयांवर ट्रेड करत आहे. 

Advertisement

न्यूज एजन्सी रॉयटर्सच्या माहितीनुसार, जागतिक बाजारात डिसेंबरनंतर सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण होण्याच अंदाज आहे.  

देशातील प्रमुख शहरांतील सोन्याचे दर (24 कॅरेट)

  • मुंबई - 72,600 रुपये/तोळे 
  • पुणे- 72,600
  • नवी दिल्ली- 72,600
  • कोलकाता- 72,600
  • अहमदाबाद - 72,650