अदाणी ग्रुपमधील गुंतवणुकीमुळे GQG पार्टनर्स मालामाल, 4.3 बिलियन डॉलरची गुंतवणूक 11.48 बिलियन डॉलरवर

यावर्षा जानेवारी महिन्यात देखील GQG ने अदाणी ग्रुपच्या सर्व शेअर्समध्ये काही गुंतवणूक केली, ज्याचं मूल्य जवळपास 8288 कोटी रुपये आहे. जैन ग्रुपने अदाणी ग्रुपमध्ये एकूण 4.3 बिलियन डॉलरची गुंतवणूक केली. जी वाढून आता 11.40 बिलियन डॉलर बनली आहे. 

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

GQG पार्टनर्सचे संचालक आणि CIO राजीव जैन यांनी अदाणी ग्रुपमध्ये गुंतवणूक करुन अवघ्या दीड वर्षात अडीच पट परतावा मिळवला आहे. 2023 मध्ये हिंडनबर्गच्या रिपोर्टनंतर जैन यांनी आपल्या फर्म GQG च्या माध्यमातून अदानी एंटरप्रायजेसच्या अनेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली होती. 

मार्च 2023 मध्ये पहिली मोठी गुंतवणूक

मार्च 2023 मध्ये जैन यांनी अदाणी ग्रुपच्या एकूण चार कंपनांमध्ये 15,400 कोटींची गुंतवणूक केली होती.  यामध्ये अदाणी पोर्ट्समध्ये 5300 कोटी रुपये, अदाणी सोल्युशन्समध्ये 1900 कोटी, अदाणी ग्रीन एनर्जीमध्ये 2850 कोटी, आणि अदाणी एन्टरप्रायजेसमध्ये 5400 कोटी रुपये गुंतवले होते. 1.88 बिलियन डॉलरची ही गुंतवणूक नंतर 4.8 बिलियन डॉलर झाली. म्हणजे या गुंतवणकीतून जैन यांना अडीच पटहून अधिक फायदा झाला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

जून 2023 मध्ये दुसरी मोठी गुंतवणूक 

जून 2023 मध्ये जैन यांनी अदाणी एन्टरप्रायजेसमध्ये 4100 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. यासोबत अदाणी एनर्जी सोल्युशून्समध्ये त्यांनी 2650 कोटींची गुंतवणूक केली होती. तर अदाणी ग्रीन एनर्जी 4600 कोटी रुपयांची गुंतवणूक केली. एकूण 1.34 बिलियन डॉलरची गुंतवणूक केली होती, जी वाढून 2.35 बिलियन डॉलर झाली आहे. 

(नक्की वाचा - तुमचा मुलगा 25 व्या वर्षी होईल कोट्यधीश, 'या' पद्धतीनं करा बचतीला सुरुवात)

GQG Partners

ऑगस्ट 2023 तिसरी गुंतवणूक 

ऑगस्ट 2023 मध्ये जैन यांनी अदाणी पॉवरमध्ये 8700 कोटींची गुंतवणूक केली. अदाणी पॉवरमधील ही 1.1 बिलियन डॉलरची गुंतवणूक पुढे 2.7 बिलियन डॉलर बनली. म्हणून ही गुंतवणूक जवळपास अडीचपट वाढली. 

Advertisement

( नक्की वाचा : 15000 पगारात बना करोडपती; EPF मधील गुंतवणुकीचं गणित समजून घ्या )

याशिवाय GQG पार्टनर्सनी अंबुजा सीमेंटमध्ये देखील गुंतवणूक केली होती. कंपनीमध्ये त्यांनी 3.4 टक्क्यांची गुंतवणूक खरेदी केली होती. ज्याचं मूल्य सध्याच्या घडीला 4265 कोटी आहे. यावर्षी जानेवारी महिन्यात देखील GQG ने अदाणी ग्रुपच्या सर्व शेअर्समध्ये काही गुंतवणूक केली, ज्याचं मूल्य जवळपास 8288 कोटी रुपये आहे. जैन ग्रुपने अदाणी ग्रुपमध्ये एकूण 4.3 बिलियन डॉलरची गुंतवणूक केली. जी वाढून आता 11.40 बिलियन डॉलर बनली आहे. 

Topics mentioned in this article