- 22 सितंबर से देशभर में जीएसटी 2.0 लागू होने से रोजमर्रा की वस्तुओं की कीमतों में कमी आएगी
- सोना निवेश के लिए लोकप्रिय विकल्प बना हुआ है क्योंकि इसे गहनों के साथ तुरंत नकदी में बदला जा सकता है
- जीएसटी कटौती से सोने की कीमतों पर सीधा असर नहीं होगा, लेकिन लोगों की बचत बढ़ने की संभावना है
देशात 22 सप्टेंबरपासून ‘जीएसटी 2.0' लागू होत असल्याने अनेक वस्तूंवरील कर कमी होणार आहे. यामुळे दैनंदिन वापरातील वस्तू स्वस्त होतील. पण, या बदलाचा सोन्याच्या किमतीवर काय परिणाम होईल, हा प्रश्न अनेकांना पडला आहे. जीएसटी कमी झाल्यामुळे थेट सोन्याच्या दरात घट होणार नाही, मात्र काही अप्रत्यक्ष कारणांमुळे सोन्याची मागणी वाढू शकते, ज्यामुळे किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.
शेअर बाजार आणि म्युच्युअल फंड्स च्या तुलनेत आजही सोन्यातील गुंतवणूक भारतीयांसाठी सुरक्षित आणि पारंपरिक पर्याय आहे. सोन्याचे दागिने त्वरित रोखीत रूपांतरित करता येतात आणि गेल्या काही वर्षांपासून डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्याही वाढली आहे.
(नक्की वाचा- GST 2.0: जीएसटीमध्ये ऐतिहासिक बदल; आजपासून काय स्वस्त आणि काय महाग होणार?)
सोन्यावर जीएसटी कपातीचा परिणाम
सोन्यावर सध्या 3% जीएसटी लागतो, जो या नवीन कर सुधारणांमध्ये कमी झालेला नाही. त्यामुळे जीएसटी 2.0 मुळे सोन्याचे दर थेट कमी होणार नाहीत. मात्र, तज्ज्ञांनुसार, नवीन कर प्रणालीमुळे लोकांच्या हातात बचत करण्यासाठी अधिक पैसा शिल्लक राहील. यामुळे अनेक सर्वसामान्य नागरिक सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यास आकर्षित होऊ शकतात.
आजकाल ॲप्सच्या माध्यमातून 100 रुपयांचेही सोने खरेदी करता येते, त्यामुळे गुंतवणुकीसाठी मोठ्या रकमेची गरज नाही. जर ही परिस्थिती निर्माण झाली आणि सणासुदीच्या काळात सोन्याची मागणी वाढली, तर किमतींमध्ये मोठी वाढ दिसू शकते. गेल्या एका आठवड्यात सोन्याच्या किमती 1,10,650 रुपये प्रति 10 ग्रॅमवरून 1,09,775 रुपयांपर्यंत खाली आल्या आहेत, पण त्यात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे.
(नक्की वाचा- Mhada News: म्हाडाची घरं आणखी स्वस्त होणार, नव्या किंमत ऐकून तुम्हीही व्हाल अवाक्)
सोन्यात गुंतवणूक करण्याची योग्य वेळ
सोन्यात गुंतवणूक करावी की नाही, यावर तज्ज्ञ दोन्ही बाजूंनी विचार करण्याचा सल्ला देत आहेत. ज्यांना दीर्घकाळासाठी सोन्यामध्ये गुंतवणूक करायची आहे, त्यांच्यासाठी ही योग्य वेळ असू शकते. सध्या जागतिक स्तरावर सुरू असलेल्या अनिश्चिततेमुळे अनेक देशांच्या मध्यवर्ती बँका सोन्याची खरेदी करत आहेत, ज्यामुळे सोन्याचे दर वाढू शकतात.
जे कमी वेळेसाठी सोन्यात गुंतवणूक करू इच्छितात, त्यांनी काही काळ वाट पाहणे योग्य ठरू शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. एकंदरीत, जीएसटीमध्ये बदल झाला असला तरी, सोन्याची किंमत मागणीवर अवलंबून असते. आगामी सणासुदीच्या हंगामात वाढलेल्या खरेदीमुळे सोन्याच्या दरात वाढ होण्याची दाट शक्यता आहे.