बँकेचे एटीएम कार्ड सोबत नाही आणि तातडीने रोख रकमेची गरज भासली, तर आता काळजी करण्याचे कारण नाही. युपीआय (UPI) तंत्रज्ञानाच्या मदतीने तुम्ही कोणत्याही फिजिकल कार्डशिवाय एटीएममधून पैसे काढू शकता. या सुविधेमुळे कार्ड चोरीला जाण्याची किंवा क्लोनिंग होण्याची भीतीही उरत नाही.
युपीआय (UPI) द्वारे पैसे काढण्याची प्रक्रिया
- सर्वप्रथम 'UPI Cash Withdrawal' किंवा 'ICCW' सुविधा असलेले एटीएम शोधा.
- एटीएम स्क्रीनवर दिसणाऱ्या 'UPI Cash' किंवा 'Cardless Cash' या पर्यायावर क्लिक करा.
- तुम्हाला जेवढी रक्कम काढायची आहे ती टाईप करा.
- स्क्रीनवर एक QR Code दिसेल. तुमच्या मोबाईलमधील BHIM, Google Pay, PhonePe किंवा Paytm यांपैकी कोणतेही ॲप उघडून तो कोड स्कॅन करा.
- मोबाईल ॲपमध्ये बँक खाते निवडा आणि तुमचा 4 किंवा 6 अंकी UPI PIN टाका.
- प्रक्रिया पूर्ण होताच एटीएम मशीनमधून तुमची रोख रक्कम बाहेर येईल.
(नक्की वाचा- Ajit Pawar Plane Case: अजितदादांच्या अपघात प्रकरणी सर्वात मोठी अपडेट; व्ही के सिंगचा CID समोर खळबळजनक दावा)
या सुविधेचे फायदे
फिजिकल कार्ड सोबत ठेवण्याचे झंझट संपते. कार्ड क्लोनिंग, कार्ड हरवणे किंवा पासवर्ड चोरीला जाण्याचा धोका शून्य होतो. हे फिचर सर्व प्रमुख युपीआय ॲप्सवर उपलब्ध आहे.
रोख रक्कम काढण्याची मर्यादा आणि नियम
एका ट्रांजॅक्शनमध्ये तुम्ही जास्तीत जास्त 10 हजार रुपये काढू शकता. तुमच्या बँकेच्या दैनंदिन यूपीआय मर्यादेनुसार ही रक्कम कमी-जास्त असू शकते. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये इंटरनेट असणे आवश्यक आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world