PF अकाऊंटमधून पैसे काढणे झाले सोपे; काय आहे प्रक्रिया? वाचा

EPFO ने अकाऊंट होल्डर्ससाठी ऑटो मोड सेटलमेंट (Auto Mode Settlement) सुविधा सुरु केली आहे. याद्वारे गरजेच्या वेळी 3 दिवसांच्या आत पैसे बँकेत जमा होणार आहेत. 

Advertisement
Read Time: 2 mins

भविष्य कर्मचारी निर्वाह निधीमध्ये (EPFO) अकाऊंट असलेल्या कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर आहे. पीएफ अकाऊंटमधील पैसे काढण्याची प्रक्रिया आणखी सोपी झाली आहे. यामुळे पैशांची गरज असलेल्या अनेकांना दिलासा मिळाला आहे. 

EPFO ने अकाऊंट होल्डर्ससाठी ऑटो मोड सेटलमेंट (Auto Mode Settlement) सुविधा सुरु केली आहे. याद्वारे गरजेच्या वेळी 3 दिवसांच्या आत पैसे बँकेत जमा होणार आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

ऑटो-मोड सेटलमेंटअंतर्गत कर्मचाऱ्यांना वैद्यकीय उपचारासाठी, लग्न, शिक्षण, भाऊ-बहीण यांच्या लग्नासाठी, घर खरेदीसाठी पैशांची गरज असल्यास या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. याआधी कर्मचाऱ्यांना केवळ आजारपणासाठी आगाऊ पैसे काढता येत  होते. 

पेसै काढण्याची लिमिट वाढवली 

नवीन नियमांनुसार, EPFO ने EPF अकाऊंटमधून पैसे काढण्याची मर्यादा (अॅडव्हान्स फंड विथड्रॉअल लिमिट) देखील वाढवली आहे. आता ही मर्यादा 50,000 रुपयांवरुन 1 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. मात्र या सुविधेचा लाभ घेण्यासाठी कर्मचाऱ्यांना आधी काही डॉक्युमेंट सादर करावे लागणार आहेत. ज्यामध्ये KYC, दाव्याच्या विनंतीची पात्रता (Claim Request Eligibility), बँक अकाऊंट डिटेल्स इत्यादींचा समावेश आहे. 

Advertisement

(नक्की वाचा - 15000 पगारात बना करोडपती; EPF मधील गुंतवणुकीचं गणित समजून घ्या)

अर्ज कसा कराल?

  • UAN आणि पासवर्ड भरुन EPFO पोर्टलवर लॉग इन करा 
  • ऑनलाईन सर्व्हिसेस>क्लेम>ऑटो मोड सेटलमेंटवर जा
  • बँक खात्याचे डिटेल्स तपासून घ्या
  • बँकेचा चेक किंवा पासबुक अपलोड करा
  • पैसे काढण्याचं कारण सांगा
  • इतर प्रोसेस पूर्ण करा

(नक्की वाचा- शेअर बाजाराच्या सत्राची वेळ वाढवण्याचा NSEचा प्रस्ताव सेबीने फेटाळला)

या व्यतिरिक्त अधिक माहितीसाठी EPFO वेबसाईट https://www.epfindia.gov.in/site_hi/ वर जाऊ शकता. याशिवाय हेल्पलाईन क्रमांक 1800-180-1425 वर कॉल करुन देखील माहिती घेऊ शकता. 

Topics mentioned in this article