Share Market: शेअर बाजाराच्या सत्राची वेळ वाढवण्यासाठीचा प्रस्ताव नॅशनल स्टॉक एक्सचेंजने सेबीला दिला होता. हा प्रस्ताव सेबीने फेटाळला आहे. समभागांची खरेदी-विक्री करणाऱ्या दलालांकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने हा प्रस्ताव फेटाळण्यात आला. एनएसईचे व्यवस्थापकीय संचालक आशिषकुमार चौहान यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना म्हटले की, "तूर्तास सत्राची वेळ वाढवण्याचा कोणताही प्रस्ताव नाही. कारण सेबीने आमचा वेळ वाढवण्यासाठीचा अर्ज फेटाळला आहे. सेबीने याबाबत शेअर बाजारातील दलालांकडून प्रतिक्रिया मागवल्या होत्या, मात्र त्या न मिळाल्याने तूर्तास हा प्रस्ताव बासनात गुंडाळावा लागत आहे."
(नक्की वाचा: NDTV Q4 Results: एनडीटीव्हीच्या महसुलात 59 टक्क्यांची वाढ, डिजिटल ट्रॅफिकमध्ये 39% ची वृद्धी)
एनएसईने वायदे बाजाराची म्हणजेच इक्विटी डेरिवेटिव्ह प्रकारातील व्यवहाराच्या सत्राची वेळ वाढवण्यात यावी, अशी मागणी केली होती. जागतिक पातळीवरील घटनांमुळे रात्री निर्माण होणारी जोखीम आणि दुसऱ्या दिवशी बाजार उघडताच त्याचा होणारा परिणाम हा कमी करणे शक्य होईल, असे म्हणत एनएसईने वेळ वाढवण्याची मागणी केली होती.
(नक्की वाचा: आता 65 वर्षांवरील नागरिकही खरेदी करु शकणार आरोग्य विमा)
एनएसईचे मुख्य व्यवसाय अधिकारी श्रीराम कृष्णन यांनी पीटीआयला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये एनएसईने नियमित सत्र संपल्यानंतर संध्याकाळी 6 वाजेपासून ते रात्री 9 वाजेपर्यंत असे आणखी एक सत्र सुरू करण्यासाठी सेबीला विनंती केली होती. हे सत्र सुरू झाल्यानंतर त्यावर काय प्रतिक्रिया मिळतात हे पाहून व्यवहाराचे सत्र रात्री 11.55 वाजेपर्यंत वाढवण्याचा एनएसई विचार करत होती.
वर्ष 2018मध्ये सेबीने वायदेबाजाराची वेळ सकाळी ९ वाजेपासून ते रात्री 11.50 वाजेपर्यंत या काळात निश्चित करण्यास सांगितले होते. कमॉडिटी वायदे बाजाराची वेळ ही सकाळी 10 वाजेपासून ते रात्री 11.55 वाजेपर्यंत असून त्या धर्तीवरच वायदेबाजाराची वेळ निश्चित करण्याचा प्रयत्न सुरू होता.
(नक्की वाचा: ज्येष्ठ नागरिकांना करामध्ये मिळतो मोठा फायदा, वाचा कसा वाचेल तुमचा पैसा?)
VIDEO: Sushilkumar Shinde यांचा पुनरुच्चार, "मोदी जर पुन्हा पंतप्रधान झाले तर...." , पाहा काय म्हणाले
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world