गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी! HSBC म्युच्युअल फंडकडून 'RedHex Hybrid Long-Short Fund' लाँच

गुंतवणूक बाजारात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी HSBC म्युच्युअल फंडने 'RedHex Hybrid Long-Short Fund' ही नवीन योजना (NFO) बाजारात आणली आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins

गुंतवणूक बाजारात ग्राहकांना नाविन्यपूर्ण पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या HSBC म्युच्युअल फंडने 'RedHex Hybrid Long-Short Fund' ही नवीन गुंतवणूक रणनीती बाजारात आणली आहे. ही रणनीती 'स्पेशलाइज्ड इन्व्हेस्टमेंट फंड' (SIF) या विशेष श्रेणी अंतर्गत सादर करण्यात आली आहे. नियमित उत्पन्नासह दीर्घकालीन भांडवली वृद्धी साध्य करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी हा एक उत्तम पर्याय मानला जात आहे. या फंडाचा न्यू फंड ऑफर (NFO) 2 जून 2026 पासून खुला झाला असून, गुंतवणूकदारांना 16 जून 2026 पर्यंत यामध्ये गुंतवणूक करता येईल. 

या उत्पादनाबाबत बोलताना HSBC म्युच्युअल फंडचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) कैलाश कुलकर्णी म्हणाले, “आजचे गुंतवणूकदार अधिक जागरूक आहेत. बदलत्या बाजारस्थितीत प्रभावीपणे काम करणारी वेगळी गुंतवणूक उपाययोजना त्यांना हवी आहे. म्युच्युअल फंडाची पारदर्शकता जपत, कमी अस्थिरतेसह अधिक चांगला, कर-कार्यक्षम आणि जोखमीच्या तुलनेत अधिक परिणामकारक परतावा देणे हे या फंडाचे उद्दिष्ट आहे.” 

Advertisement

तर मुख्य गुंतवणूक अधिकारी (CIO – Fixed Income) श्रीराम रामनाथन यांनी सांगितले की, सक्षम निवड आणि जोखीम व्यवस्थापनाच्या जोरावर आम्ही काम करत आहोत. हा फंड निश्चित उत्पन्न साधने (Fixed Income), इक्विटी आर्बिट्राज तसेच वेगाने विकसित होणाऱ्या REIT आणि INVIT युनिट्समध्ये संतुलित गुंतवणूक करेल. 

(नक्की वाचा-  मारुती सुझुकीचं ऐतिहासिक पाऊस, देशातील पहिली 'WagonR Flex Fuel' कार लाँच; शेतकऱ्यांना होणार फायदा)

SIF (स्पेशलाइज्ड इन्व्हेस्टमेंट फंड) म्हणजे काय? 

पारंपरिक म्युच्युअल फंड आणि हाय-नेट-वर्थ गुंतवणूकदारांसाठी असलेले पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस (PMS) किंवा अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंड (AIF) यांच्यातील दरी भरून काढण्यासाठी सेबीने (SEBI) ही नवी संकल्पना आणली आहे. SIF हा PMS आणि म्युच्युअल फंड यांच्यातील 'सुवर्णमध्य' साधणारा सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय ठरत आहे. 

  1. म्युच्युअल फंड आणि PMS चा सुवर्णमध्य: SIF हे उत्पादन पारंपरिक म्युच्युअल फंडांची कडक नियामक पारदर्शकता आणि PMS सारख्या उच्च-मूल्य उत्पादनांमधील गुंतवणूक व्यवस्थापनाची लवचिकता यांचा उत्कृष्ट समतोल साधते. 
  2. मध्यम आकाराच्या गुंतवणुकीची सोय: PMS किंवा AIF मध्ये गुंतवणूक करण्यासाठी खूप मोठी रक्कम लागते. त्या तुलनेत SIF मध्यम आकाराची गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त आहे. या फंडासाठी किमान अर्ज रक्कम 10 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. तर मान्यताप्राप्त गुंतवणूकदारांसाठी ही मर्यादा केवळ 1 लाख रुपये आहे. 
  3. मालमत्ता वर्गांचे वैविध्य: SIF च्या माध्यमातून केवळ एकाच क्षेत्रात गुंतवणूक न करता निश्चित उत्पन्न साधने (Fixed Income), इक्विटी आर्बिट्राज, REIT आणि INVIT युनिट्स यांसारख्या विविध मालमत्ता वर्गांमध्ये संतुलित गुंतवणूक करता येते. 
  4. साप्ताहिक रिडेम्प्शनची लवचिकता: हा एक इंटरव्हल इन्व्हेस्टमेंट फंड आहे. हा फंड कोणत्याही कामकाजाच्या दिवशी गुंतवणूक स्वीकारतो आणि गुंतवणूकदारांना साप्ताहिक रिडेम्प्शनची (पैसे काढण्याची) लवचिक सुविधा उपलब्ध करून देतो. 
  5. मजबूत जोखीम नियंत्रण: SIF मध्ये सक्रिय पोर्टफोलिओ व्यवस्थापन केले जाते. यात रणनीती-स्तरीय कठोर जोखीम नियंत्रण चौकट असल्याने बाजारातील अस्थिरता कमी होऊन गुंतवणूकदारांचे नुकसान टळू शकते. 

(नक्की वाचा-  Hero MotoCorp New Bike: हिरो मोटोकॉर्पचा मोठा धमाका! पेट्रोल किंवा चार्जिंगशिवाय धावणार बाईक)

फंडाचे इतर महत्त्वाचे तपशील

  • बेंचमार्क: या फंडासाठी 'NIFTY 50 Hybrid Composite Debt 50:50 Index' हा बेंचमार्क असेल. 
  • गुंतवणुकीचा उद्देश: बाजारातील चढ-उतारांचा मर्यादित परिणाम राखणे, कर-कार्यक्षमता वाढवणे आणि उत्तम नियमित उत्पन्न मिळवून देणे.
     
Topics mentioned in this article