जाहिरात

Hero MotoCorp New Bike: हिरो मोटोकॉर्पचा मोठा धमाका! पेट्रोल किंवा चार्जिंगशिवाय धावणार बाईक

Hero MotoCorp Launch First Flex Fuel Bike : भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रातील आघाडीची कंपनी 'हिरो मोटोकॉर्प' (Hero MotoCorp) आज आपली पहिली 'फ्लेक्स-फ्यूल' (Flex-Fuel) बाईक लॉन्च करत आहे. ही बाईक 100% पर्यंतच्या इथेनॉल मिश्रित इंधनावर धावू शकणार आहे.

Hero MotoCorp New Bike: हिरो मोटोकॉर्पचा मोठा धमाका! पेट्रोल किंवा चार्जिंगशिवाय धावणार बाईक

भारतीय दुचाकी बाजारात आज एक नवा इतिहास रचला जाणार आहे. प्रमुख दुचाकी उत्पादक कंपनी हिरो मोटोकॉर्प (Hero MotoCorp) आज, 3 जून रोजी आपली पहिली फ्लेक्स-फ्यूल (Flex-Fuel Motorcycle) बाईक भारतीय बाजारात उतरवत आहे. सध्या या नव्या मोटरसायकलचे अधिकृत नाव, इंजिनची क्षमता आणि इतर तांत्रिक वैशिष्ट्ये कंपनीने गुलदस्त्यात ठेवली असली, तरी ऑटो जगतात या बाईकबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

ऑटो इंडस्ट्रीच्या रिपोर्ट्सनुसार, हिरो कंपनीची ही नवी पर्यावरणपूरक बाईक तिच्या 'एचएफ डिलक्स'  किंवा भारतातील सर्वात जास्त विकली जाणारी बाईक 'स्प्लेंडर'च्या मॉडेलवर आधारित असू शकते.

काय आहे 'फ्लेक्स-फ्यूल' तंत्रज्ञान?

हिरोच्या या नव्या फ्लेक्स-फ्यूल बाईकचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तिचे इंधन पर्याय. ही बाईक केवळ पेट्रोलवर नाही, तर इथेनॉल मिश्रित इंधनावर चालणार आहे. ही बाईक E20 (20% इथेनॉल आणि 80% पेट्रोल) पासून ते थेट E100 म्हणजे 100% शुद्ध इथेनॉल पर्यंतच्या कोणत्याही मिश्रित इंधनावर सहज धावू शकेल.

(नक्की वाचा-  Vaibhav Sooryavanshi: वैभवसमोर मोठा पेच; अलिशान कार जिंकली, पण एक खंत सतत सतावेल!)

इथेनॉल हे पेट्रोलच्या तुलनेत स्वस्त आणि पर्यावरणपूरक असते. त्यामुळे या तंत्रज्ञानामुळे सर्वसामान्यांचा प्रवासाचा खर्च तर कमी होईलच, शिवाय वाहनातून होणारे कार्बन उत्सर्जनही मोठ्या प्रमाणावर घटणार आहे.

'एचएफ डिलक्स' की 'स्प्लेंडर'

हिरो कंपनी आपले हे नवे आणि क्रांतिकारी फ्लेक्स-फ्यूल इंजिन नक्की कोणत्या बाईकमध्ये देणार, यावर सध्या ऑटो क्षेत्रात दोन वेगवेगळे मतप्रवाह पाहायला मिळत आहेत. जानेवारी 2025 मध्ये पार पडलेल्या 'भारत मोबिलिटी एक्स्पो' दरम्यान हिरो मोटोकॉर्पने 'HF Deluxe Flex-Fuel' चा प्रोटोटाइप जगासमोर सादर केला होता. त्यामुळे कंपनी आज याच बाईकचे कमर्शियल मॉडेल लॉन्च करेल, अशी आशा अनेकांना आहे.

(नक्की वाचा-  Khan Sir: खळबळजनक! खान सरांच्या कोचिंग क्लासवर गोळीबार; दोन दिवसांत संस्था उडवून देण्याची धमकी)

स्प्लेंडरची शक्यता का वर्तवली जातेय? 

दुसरीकडे, 'हिरो स्प्लेंडर' ही भारताच्या ग्रामीण आणि शहरी भागात सर्वाधिक विकली जाणारी आणि ग्राहकांच्या गळ्यातील ताईत बनलेली बाईक आहे. त्यामुळे हे फ्लेक्स-फ्यूल मिशन देशातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचे असेल, तर कंपनी 'Splendor Flex-Fuel' लॉन्च करण्याचा निर्णय घेऊ शकते, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. मध्यमवर्गीय भारतीय ग्राहकांसाठी ही बाईक नक्कीच गेमचेंजर ठरू शकते.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com