हुरुन इंडियाच्या (Hurun's 2024 Rich List ) यंदाच्या श्रीमंतांच्या यादीत 1539 भारतीयांचा समावेश आहे. त्यांची एकूण संपत्ती 1,000 कोटींपेक्षा अधिक आहे. ही संख्या गेल्यावेळेसच्या तुलनेत 220 हून अधिक आहे. भारतातील एक हजार कोटींपेक्षा अधिक संपत्ती असलेल्यांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं आहे. यंदा पहिल्यांदाच या संख्येत वाढ पाहायला मिळत आहे.
या सूचीत 272 नावं पहिल्यांदाच यादीत दाखल झाली आहेत. 1,000 कोटींहून अधिक संपत्ती असलेल्यांनी पहिल्यांदाच 1,500 चा आकडा पार केला आहे आणि गेल्या पाच वर्षांदरम्यान यात 86 टक्क्यांनी वाढ झाली आहे. हुरुन इंडियानुसार, गेल्या वर्षी भारतात प्रत्येक पाच दिवसात एक नवा अब्जाधीश तयार झाला आहे.
मुंबईत सर्वाधिक श्रीमंत...
या यादीनुसार मुंबईत सर्वाधिक 386 श्रीमंत व्यक्ती राहतात. दिल्लीत 217, हैद्राबाद 103 श्रीमंत व्यक्ती राहतात. मुंबईत यंदाच्या वर्षी 66 नवी नावं जोडली गेली आहेत.
नक्की वाचा - Hurun India rich list 2024 : गौतम अदाणी श्रीमंतांच्या यादीत पहिल्या स्थानी; भारतात 5 दिवसात एक नवा अब्जाधीश
अदाणी समुहाचे चेअरमन गौतम अदाणी आणि त्यांचे कुटुंबीय हुरुनच्या 2024 च्या श्रीमंतांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर पोहोचले आहेत. 95 टक्के वाढीसह त्यांची संपत्ती 11.61 लाख कोटींच्या पार गेली आहे. हुरुनच्या भारतातील श्रीमंतांच्या यादीनुसार, देशभरात अब्जाधीशांच्या संख्येत वाढ झाली आहे. सद्यस्थितीत 334 भारतीय अब्जाधीश आहेत. जे 13 वर्षांपूर्वीच्या यादीच्या सुरुवातीला असलेल्या अब्जाधीशांच्या संख्येपासून सहापटीने जास्त आहेत.
शाहरूख खानलाही मिळाली श्रीमंतांच्या यादीत जागा...
भारतीय चित्रपटसृष्टीचा बादशाह म्हणून ओळख असलेला शाहरूख खान याने पहिल्यांदाच हुरून इंडियाच्या श्रीमंतांच्या यादीत जागा पटकावली आहे. त्याची एकूण संपत्ती 7,300 कोटींपर्यंत पोहोचली आहे. चित्रपट क्षेत्रातून शाहरुख खान याच्याशिवाय जूही चावला आणि तिचे कुटुंबीय, ऋतिक रोशन, करण जोहर आणि अमिताभ बच्चन यांचा श्रीमंतांच्या यादीत समावेश आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world