जाहिरात

अदाणी समुहाचे चेअरमन गौतमी अदाणी यांनी केली नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची पहाणी

NMIA मधील टीम आणि भागीदार आणि भागधारक, कंपन्यांचे प्रतिनिधी देखील यावेळी उपस्थित होते.

अदाणी समुहाचे चेअरमन गौतमी अदाणी यांनी केली नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची पहाणी
नवी मुंबई:

अदाणी समूहाचे अध्यक्ष गौतम अदाणी यांनी आज नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला (NMIA) भेट दिली. शिवाय विमानतळाच्या कामाचा आढावा ही त्यांनी घेतला. जून 2025 मध्ये या विमानतळाचे उद्घाटन होणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प वेगाने पूर्णत्वाकडे वाटचाल करत आहे. त्या दृष्टीने काम किती वेगाने सुरू आहे याची पाहाणी गौतम अदाणी यांनी केली. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

यावेळी त्यांच्या बरोबर डॉ. प्रीती अदाणी, जीत अदाणी आणि दिवा अदाणी ही उपस्थित होत्या. या शिवाय अरुण बन्सल, मुख्य कार्यकारी अधिकारी, अदाणी  एअरपोर्ट होल्डिंग्ज लि. हे ही उपस्थित होते. या शिवाय  कॅप्टन बीव्हीजेके शर्मा, मुख्य कार्यकारी अधिकारी, नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लि. यांनी सहभाग घेतला. 

ट्रेंडिंग बातमी - Indian Airports: ही जगातील सर्वात सुंदर विमानतळं आहेत का?

NMIA मधील टीम आणि भागीदार आणि भागधारक, कंपन्यांचे प्रतिनिधी देखील यावेळी उपस्थित होते. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ एकदा तयार झाल्यावर या प्रदेशातील कनेक्टिव्हिटी आणि विकासाला नवी दिशा देईल, असे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रायव्हेट लिमिटेडच्या प्रवक्त्यांनी यावेळी सांगितले आहे. नवी मुंबई विमानतळ हा एक महत्वकांक्षी प्रकल्प समजला जातो. देशातील सुंदर विमानतळा पैकी एक हे विमानतळ होणार आहे.