भारतीय अर्थव्यवस्था यावर्षी वेगाने वाढीचा अंदाज वर्तवण्यात आहे. 2024 या आर्थिक वर्षात आर्थिक विकास दर 6.8 टक्के राहील, असा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधी अर्थात इंटरनॅशनल मॉनिटरी फंडने (IMF) वर्तवला आहे. याआधी आएमएफने विकास दर वाढीचा अंदाज 6.5 टक्के वर्तवला होता. त्यात सुधारणा करुन नवीन अंदाज वर्तवला आहे.
भारतीय अर्थव्यवस्थेची वेगाने सुरु असलेली घोडदौड पुढे सुरु राहिल असंही आयएमएफने म्हटलं आहे. मंगळवारी आयएमएफने ही आकडेवारी जारी केली आहे. यामधील आकडेवारीनुसार, विकासदर 2024 मध्ये 6.8 टक्के तर 2025 मध्ये 6.5 टक्के राहील, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. 2025 वर्षाच्या अंदाजात आयएमएफने कोणताही बदल केलेला नाही.
मुंबईतील बँकेवर RBI चे निर्बंध, ग्राहकांना बसणार मोठा फटका
IMF च्या अंदाजानुसार, चीनच्या अर्थव्यवस्थेचा विकास दर घटण्याची शक्यता आहे. चीनचा जीडीपी 4.6 टक्क्यांच्या वेगाने वाढेल. अमेरिकेचा जीडीपी 2.7 टक्क्यांच्या वेगाने वाढेल. तर रशियाचा जीडीपी 3.2 टक्के वेगावे वाढण्याचा अंदाजच आहे.
महागाई घसरली, पण तुमचा EMI कमी होणार आहे का?
देशातील महागाईची सद्यस्थिती?
देशातील महागाईबाबतही IMF ने अंदाज वर्तवला आहे. भारतात 2024 मध्ये महागाी दर 4.6 टक्के आमि 2025 महागाई दर 4.2 टक्के राहण्याची शक्यता आहे. IMF चा हा अंदाज रिझर्व्ह बँक ऑफ इंडियापेक्षा थोडा जास्त आहे.