रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (RBI) बँकिंग नियमांचं उल्लंघन करणाऱ्या बँकांवर कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वीच राज्यातील शिरपूर मर्चंट्स को -ऑपरेटिव्ह बँकेवर कारवाई केली होती. त्यापाठोपाठ आता मुंबईतल्या सर्वोदय सहकारी बँकेवरही (Sarvodaya Co-operative Bank ) निर्बंध घातले आहेत. बँकेच्या आर्थिक परिस्थितीमुळे ही कारवाई करण्यात आलीय. आरबीआयच्या या निर्णयाचा फटका ग्राहकांना बसणार आहे.
आरबीआयनं निर्बंध घातल्यानं या बँकेतील खातेदारांना फक्त 15 हजार रुपये काढता येतील. तसंच पात्र ठेवीदारांना ठेवीवरील जमा वीमा आणि क्रेडिट गॅरंटी निगम (डीआयसीजीसी) मधून पाच लाख रुपयांपर्यंतच्या ठेव विम्याची रक्कम मिळवण्याचा अधिकार असेल.
महागाई घसरली, पण तुमचा EMI कमी होणार आहे का?
सर्वोदय सहकारी बँकेवर बँकिंग अधिनियम, 1949 च्या कलम 35 ए मधील निर्देशानुसाीर ही कारवाई करण्यात आली आहे. सोमवार (15 एप्रिल 2024) रोजी बँकेचे व्यवहार संपल्यापासून हे निर्बंध लागू असतील. सर्वोदय सहकारी बँकेला रिझर्व्ह बँकेला रिझर्व्ह बँकेच्या परवानगीशिवाय कोणतेही कर्ज किंवा अगाऊ रक्कम देता येणार नाही. त्याचबरोबर त्याचे नूतनीकरण करता येणार नाही. त्याचबरोबर या बँकेत कोणतीही गुंतवणूक करता येणार नाही. तसंच कोणतेही दायित्व घेता येणार नाही तसंच पेमेंटही करता येणार नाही.
पाडव्याच्या दिवशी संक्रात! राज्यातील 'या' सहकारी बँकेवर रिझर्व्ह बँकेची कारवाई
रिझर्व्ह बँकेनं दिलेल्या माहितीनुसार, 'सर्व बचत तसंच चालू खात्यामधील ठेवीदारांना कोणत्याही खात्यातील एकूण शिल्लक रकमेतील 15000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढण्याची परवानगी नाही. या बँकेत तुमचे खाते असेल तर घाबरुन जाऊ नका. या निर्देशांचा अर्थ बँकेचे लायसन्स रद्द करण्यात आले आहे, असा होत नाही, असंही आरबीआयनं स्पष्ट केलंय.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world