Influencer Ankur Warikoo driver: गुरुग्राम येथील प्रसिद्ध उद्योजक आणि कंटेंट क्रिएटर अंकुर वारिकू (Ankur Warikoo) यांनी त्यांच्या ड्रायव्हरला मिळणारा पगार जाहीर केला आहे. यावरून आता मोठी चर्चा सुरू झाली आहे. अंकुर वारिकू यांनी 'X' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर केली. यात त्यांनी सांगितले की, दयानंद भैय्या नावाचे त्यांचे ड्रायव्हर 13 वर्षांपूर्वी त्यांच्यासोबत 15,000 मासिक पगारावर रुजू झाले होते.
दयानंद भैय्या यांचा सध्याचा मासिक पगार 53,350 रुपये आहे. यंदा त्यांना 11% ची वार्षिक वेतनवाढ मिळाली आहे. पगाराव्यतिरिक्त त्यांना आरोग्य विमा, एक महिन्याचा दिवाळी बोनस आणि नवीन स्कूटर भेट मिळाली आहे. दयानंद भैय्या हे आजही शिस्तबद्ध जीवन जगतात.
ड्रायव्हर नाहीत, तर 'कुटुंबाचा सदस्य
वारिकू यांनी स्पष्ट केले की, दयानंद भैय्या हे त्यांच्या कुटुंबासाठी केवळ ड्रायव्हर नाहीत, तर कुटुंबाचा भाग आहेत. त्यांच्या घराच्या डुप्लिकेट चाव्या आहेत तर एटीएम पिन देखील माहीत आहे. तरीही ते खासगी आर्थिक बाबींमध्ये हस्तक्षेप करत नाहीत. मुला-मुलींना क्लासेसला घेऊन जातात आणि अनुपस्थितीत घरातील सर्व महत्त्वाच्या कामात मदत करतात. वारिकू यांनी विश्वास व्यक्त केला आहे की, पुढील 5 ते 6 वर्षांत दयानंद भैय्यांचा पगार 1 लाख प्रति महिना होईल.
(नक्की वाचा- Viral VIDEO: फोनवरचं बोलणं ऐकून Uber ड्रायवरने गाडी थांबवली अन्... तरुणीच्या आयुष्यभर लक्षात राहील असा क्षण)
The latest annual increment has raised our driver Dayanand Bhaiya's monthly salary to Rs. 53,350 plus insurance, one-month Diwali bonus, and a scooty.
— Ankur Warikoo (@warikoo) November 19, 2025
He joined us 13 years ago at Rs. 15,000 and has since become an integral part of our family while building his own life. His… pic.twitter.com/uDpugIbeSs
सोशल मीडियावर प्रतिक्रिया
वारिकू यांच्या खुलास्यानंतर सोशल मीडियावर मिश्र प्रतिक्रिया उमटल्या. अनेकांनी वारिकू यांच्या उदारतेचे कौतुक केले, तर काहींनी खासगी माहिती सार्वजनिक केल्याबद्दल टीका केली. एका युझरने 'पगाराची रक्कम सार्वजनिक करण्याची काय गरज होती?' असा प्रश्न विचारला, यावर वारिकू म्हणाले की, "माझ्या कंटेंटसाठी तुम्ही नवीन असावेत. पगार सर्वांसाठी खुला आहे.
दुसऱ्या युझरने 'एटीएम पिन आणि घराच्या चाव्या' उघड करणे धोकादायक असल्याचे म्हटले. यावर वारिकू यांनी उत्तर दिले की, "पगार ही खासगी माहिती आहे, असे मानण्याची आपल्यावर सक्ती केली गेली आहे. कंपन्या त्यांच्या अक्षमतेमुळे पगार लपवतात. माझ्या स्टार्टअपमध्ये, पगार शंभर टक्के पारदर्शक आहेत."
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world